नाहीतर तुझी *** काढून…; आऊंनी मॅनेजरकडून असे वसूल केले होते कामाचे पैसे

मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील असे काही तारे ज्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक दमदार भूमिका आणि तगड्या अभिनयानं ते कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. ज्यांचा उत्साह आजही पंचवीशीतील तरुणीसारखा असतो, बिनधास्त, बेधडक, स्पष्टवक्त्या अशा सर्वांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. सिनेसृष्टीतील सगळ्यांच्या लाडक्या आऊ आज झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बस बाई बस हा कार्यक्रम मागचे अनेक दिवस चर्चेत आहेत. स्पष्टवक्त्या आऊ आज त्यांच्या त्यांच्या स्ट्रगलिंगच्या काळातील एक भन्नाट किस्सा सांगणार आहेत.

अभिनेत्री उषा नाडकर्णी या मोठ्या स्ट्रगलमधून पुढे आल्या आहेत. अभिनेत्री होण्याआधी त्या बँकेत काम करायच्या. अभिनय, नाटक , नोकरी, घर सांभाळून त्या आयुष्य जगत होत्या. मोठ्या संघर्षानंतर आऊ आज मोठ्या यशापर्यंत पोहोचल्या आहेत. या प्रवासत त्यांना आजवर जशा अनेक उत्तम भूमिका मिळाल्या तसेच त्यांना अनेक चांगली वाईट माणसंही भेटली. त्याच माणसांचा एक मजेशीर किस्सा आऊंनी शेअर केलाय.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 4 : अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा दिसणार बिग बॉस मराठीत? केली मोठी घोषणा

बस बाई बसच्या मंचावर बसमधील महिला गँग येणाऱ्या पाहुण्या प्रवासाला त्यांचे प्रश्न विचारतात. एका महिलेनं विचारलं, ‘ताई तुम्ही अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. एखाद्या निर्मात्यांनी तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्यांच्याकडून ते चांगलेच वसुल केले असतील?’ या प्रश्नावर आई म्हणाल्या, ‘तुम्हाला सांगते माझे राहिलेले पैसे जर कोणी गोळा करून देईल तर त्याला मी त्यातील 10 -20% देऊन टाकेन’.  आऊंच्या या उत्तरावर एकच हशा पिकला.

आऊ पुढे म्हणाल्या, ‘जितकी चांगली माणसं आहेत पैसे देण्यात तितकेच लबाड लोक आहेत.  एक मालिका मी 10 एपिसोड करून सोडली. त्यानंतर त्यांनी मला एक पैसाही मिळाला नाही. कित्येक वेळा मी मॅनेजरला फोन केला.  पण फोन केला की वेगळीच माणसं फोन उचलून मॅनेजर नाहीये असं सांगायचे. मला प्रश्न पडला हा रोज कसा नसतो. आणि एक दिवस गमंत झाली त्या मॅनेजरनंच फोन उचलला. मी त्याला म्हटलं की, माझे पैसे देणार आहेस की नाही. नाहीतर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तुझी चड्डी खोलेन आणि पैसे घेऊन जाईन आणि तिसऱ्या दिवशी माझ्या घरी चेक आला’. आऊंचा हा किस्सा ऐकून सगळ्यांना हसू आवरलेलं नाही.

आऊ त्यांच्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से आणि गमतीशीर प्रश्नांची भन्नाट उत्तर देताना दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टास्क, राडा अन् भांडणांची तारीख ठरली! वाचा कधीपासून सुरू होतंय बिग बॉस मराठी ४

मुंबई: बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची तारीख …

अखेर प्रतिक्षा संपली! या तारखेला सुरु होणार Bigg Boss Marathi चा चौथा सीझन

मुंबई, 10 सप्टेंबर: लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत …