पुढील महिन्यापासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होते आहे. BBM चे चौथे पर्व काही कारणास्तवर लांबणीवर पडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्या दरम्यानच आता बिग बॉस मराठी ४च्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
हे वाचा-रस्त्यावरच रॅम्प वॉक करतेय सई ताम्हणकर; म्हणाली- स्वप्न कधीतरी खरी होतातच!
कधीपासून सुरू होणार बिग बॉस मराठी ४?
बिग बॉस मराठी ४ विषयी माहिती देणारी पोस्ट मांजरेकर (Mahessh Manjrekar) आणि कलर्सकडून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनुसार बिग बॉस मराठी ४ हा सीझन ०२ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होतोय. या पोस्टमध्ये असंं म्हटलं आहे की, ‘१०० दिवसांचा हा खेळ. कधी पास, कधी फेल. पण महेश सरांच्या मते, यंदा All is well. पाहायला विसरू नका BIGG BOSS मराठीचा Grand Premiere २ ऑक्टोबरला संध्या ७ वा, सोम – शुक्र रात्री १० वा, शनि- रवि रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर!’
हे वाचा-ब्रह्मास्त्र पाहताना तुमच्याही नजरेतून सुटली असेल ही गोष्ट, दीपिका आहे रणबीरची आई?
चॅनेलकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये महेश यांचा हटके अंदाजही पाहायला मिळतो आहे. यावेळी मांजरेकर म्हणतायंत की ते जरी या कार्यक्रमाचे होस्ट असले तरी त्यांना अनेक भूमिका कराव्या लागतात. या भूमिका कोणत्या याची झलकच या प्रोमोमध्ये दिसते आहे. मांजरेकर कधी या शोमधील स्पर्धकांना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पोहोचवणारे पोस्टमन होतात, तर कधी खेळातील गुंता सोडवणारा तटस्थ अंपायर. कधी कधी महेश मांजरेकरांना स्पर्धकांना शिक्षा देणाऱ्या कडक मास्तरांचीही भूमिका स्विकारावी लागते, असं या मजेशीर प्रोमोमध्ये मांडण्यात आले आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला बिग बॉस मराठी ४ चा प्रोमो काही वेळातच व्हायरलही झाला आहे. दरम्यान आता या नव्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या