दादूस आणि जय यांनी प्रभादेवीच्या राजाची मनोभावे आरती केली. आरती नंतर मीडियाशी संवाद साधनताना दोघांनी मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना दादूस म्हणाले, ‘बाप्पा आता बास झालं. मागचे 2-3 वर्ष आम्ही ज्या अवस्थेत काढली तसे दिवस परत आणू नकोस. तुझ्या आगमनानं आम्ही सगळे खूश आहोत आणि आम्हाला असंच राहू देत’.
हेही वाचा – Bigg Boss Marathi 4: ‘या’ दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक?
तर बिग बॉस फेम जय दुधाणे म्हणाला, ‘विघ्नहर्ता म्हणजे विघ्न दूर करणारा आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं बाप्पानं विघ्न दूर केलं आहे. सगळं रिस्टार्ट केलं आहे ज्या पद्धतीनं दहीहंडी साजरी केली त्याच उत्साहानं गणपती साजरे करत आहोत. जुने दिवस परत आल्यासारखं वाटत आहे. बाप्पाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी पाहून खूप आनंद होत आहे’.
बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेले कलाकार जय दुधाणे आणि दादूस यांनी प्रभादेवीच्या राजाच्या आरतीला हजेरी लावली. #GaneshChaturthi #Ganeshotsav #BappaMorya pic.twitter.com/yJsO6GUE4z
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
जय आणि दादूस यांनी ब्लॅक जीपमधून वाजत गाजत प्रभादेवीच्या राजाच्या मंडपात एंट्री घेतली. त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. जीपवर बिग बॉस मराठी 4 चे पोस्टर्सही लावण्यात आले होते. दादूस आणि जयच्या एंट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन दिग्दर्शक महेश मांजरेकरच होस्ट करणार आहेत. सीझनची डेट या आठवड्यात कळणार आहे. महेश मांजरेकर चौथ्या सीझनच्या सगळ्या स्पर्धकांबरोबर प्रोमोचं शुटींग करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या