शाहरुखनं सहा वर्षांपूर्वीच रणवीरच्या अटकेबद्दल केलं होतं भाकित
बिग बॉस मराठी ४ चा टीझर रिलीज झाला खरा पण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कार्यक्रमाच्या आधीच्या तीनही पर्वामध्ये महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालक म्हणून काम पाहिले होते. आतादेखील त्यांनीच याही पर्वाचं सूत्रसंचालन करावं अशी प्रेक्षकांची तीव्र इच्छा आहे. मात्र, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मांजरेकरच करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यातच महेश मांजरेकर यांनीदेखील त्यांच्या सोशल मीडियावर कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केलेला नाही.
वास्तविक बिग बॉसच्या संदर्भातील कोणतीही अपडेट सोशल मीडियावर शेअर करायला मांजरेकर कधीच विसरलेले नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत. काही बातम्यांमध्ये तर सिद्धार्थ जाधव याच्याकडे सूत्रसंचालन दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. या बातम्यांमुळे चाहते नाराज झाले आहेत.
अभिनेत्री गरोदर, चाहते म्हणाले ‘मुलगा होत नाही तोपर्यंत बाळांना जन्म देणार’
दरम्यान, काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश मांजरेकर यांचं बिग बॉस कार्यक्रमाबरोबरच कंत्राट तीन वर्षांसाठी होतं. ते आता संपलं आहे. त्यामुळे चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा नेमकी कुणाकडे दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी प्रोमो शेअर न केल्यासंदर्भात सुत्रांनी सांगितलं की, सध्या ते ‘दे धक्का २’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केलेला नाही. हा सिनेमा येत्या ५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
अशोक सराफांसोबतची पहिली भेट विसरूच शकत नाही- रवी जाधव
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या