बूम बूम बुमराचं कमबॅक होणार
मोहालीत ऑस्ट्रेलियन कर्णधारानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण त्याचवेळ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं पुढच्या सामन्यासाठी आशिया कप खेळू न शकलेल्या जसप्रीत बुमराच्या कमबॅकविषयी सांगितलं. बुमराला पहिल्या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली असून तो पुढच्या दोन सामन्यात खेळणार असल्याचं रोहितनं म्हटलं आहे.
हेही वाचा – ICC Ranking: भारतीय महिला क्रिकेटरची रँकिंगमध्ये मोठी झेप, टी20त थेट दुसऱ्या स्थानी
बुमरा पूर्णपणे फिट
आशिया कपआधी जरस्पीत बुमराला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची आशिया कपसाठीच्या भारतीय संघात निवड झाली नाही. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला होता. सुपर फोर फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. पण आता बुमरा पूर्णपणे फिट झाला असून आगामी टी20 लढतीत खेळण्यासाठी तो सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढचे दोन सामने नागपूर आणि हैदराबादमध्ये होणार आहेत.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या