मोहाली, 20 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियानं मोहाली टी20त नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला विश्रांती दिली असून दिनेश कार्तिक विकेट किपिंग करणार आहे.
भारतीय प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युजवेंद्र चहल
उमेश यादवला संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच टी20त उमेश यादवला संधी देऊन रोहित अँड कंपनीनं आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मालिकेपूर्वी मोहम्मद शमीला कोरोना झाल्यामुळे आयत्या वेळी भारतीय संघात उमेश यादवची एन्ट्री झाली. पण उमेशनं गेल्या तीन वर्षात एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे मोहाली टी20त उमेश यादवचं अंतिम अकरात नाव दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. 2012 साली टी20 पदार्पण केलेल्या उमेश यादवनं आतापर्यंत केवळ सात आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 9 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sport
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या