प्रॅक्टिस के बाद… पाहा किंग कोहली आणि कुंग फू पंड्याचा अनोखा डान्स Video

मोहाली, 18 सप्टेंबर: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला टी20 सामना खेळण्यासाठी मोहालीत पोहोचली आहे. आज सकाळच्या सत्रात भारतीय खेळाडूंनी चांगला सरावही केला. पण सरावानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीनं थोडी मजा मस्तीही केली.

हार्दिक-विराटच्या डान्स स्टेप्स

हार्दिक आणि विराट एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. अवघ्या 11 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो चाहत्यांनी लाईक केलं आहे. हार्दिक पंडया आणि विराट कोहली दोघांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. आणि बघता बघता सोशल मीडियात तो तुफान व्हायरल झाला आहे.

कांगारुंचं आव्हान

येत्या आठवड्यात टीम इंडिया कांगारुंविरुद्ध तीन टी20 सामने खेळणार आहे. वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघाच्या तयारीच्या दृष्टीनं ही मालिका महत्वाची ठरणार आहे. 20 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मोहालीतून सुरुवात होईल. तर 23 आणि 25 सप्टेंबरला या मालिकेतील उर्वरित सामने नागपूर आणि हैदराबादमध्ये खेळवण्यात येतील.

हेही वाचा – IndW vs EngW:  जोडी तुझी माझी… गेल्या 20 वर्षात भारतीय महिला क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडलं

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कामगिरीची अपेक्षा

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज झाला आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीनं भारतीय संघासाठी ही सरावाची मोठी संधी आहे. वर्ल्ड कपसाठीचा संघच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. त्यात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये विराटनं पाच सामन्यात 2 अर्धशतकं आणि एका खणखणीत शतकासह 276 धावा फटकावल्या होत्या.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

रोहित शर्माने पकडला कार्तिकचा गळा, LIVE सामन्यात असं घडलं तरी काय?

मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकला …

पराभवानंतर हताश रोहित शर्माने दिला गंभीर इशारा; टी-२० वर्ल्डकपच्या आधी सुधारा नाही तर…

मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत (Ind vs Aus) भारताने ४ विकेटनी गमावली. टीम …