राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास होते. शुटींगसाठी ते मुंबईमध्ये राहत होते. त्यांच्या जन्म मध्यवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच घरची हालाकीची परिस्थिती ते पाहत आले आहेत. त्यामुळे पहिल्यांपासूनच चिकाटी त्यांच्या अंगी होती. आपल्या तगड्या मेहनतीनं त्यांनी सिनेसृष्टीत नाव कमावलं. राजू श्रीवास्तव यांच्याकडे आज आलिशान घर आहे. अभिनेता लग्झरियस आयुष्य जगत होता.
राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचं होतं. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव एका कॉमेडी शोसाठी लाख रुपये चार्ज करतात. सध्या त्यांच्याकडे 15-20 करोडोची संपत्ती आहे.
राजू श्रीवास्तव संपूर्ण जगभर कॉमेडी शो करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ऑडिओ व्हिडीओ सीरिजही काढली आहे. आजवर त्यांनी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. एका जाहिरातीसाठीही ते लाखांमध्ये मानधन घेत होते. महानायक अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करण्यासाठी राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध आहेत. स्ट्रगलच्या काळात त्यांनी बिग बींची मिमिक्री करुन पैसे कमावले होते. टीव्ही शो, मिमिक्री, जाहीरातीत काम करुन पैसे कमावणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे यूट्यूबरही सर्वाधिक सब्स्क्राइबर्स आहेत. युट्यूबकडूनही त्यांना पैसे मिळतात.
हेही वाचा – Comedian Raju Srivastava Dies: कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा
राजू श्रीवास्तव लग्झरी कारचे शॉकिन होते. त्यांच्याकडे ऑडी Q7 कार आहे. ज्याची शोरुम किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे 3 BMW कारही आहेत. ज्यांची शोरुम किंमत 40 लाख रुपये आहे.
राजू श्रीवास्तव यांनी 1993मध्ये लग्न केलं. शिखा श्रीवास्तव असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या