ऑस्ट्रेलिया सीरीजआधी नवा लूक
विराट कोहली हा क्रिकेट आयकॉन तर आहेच पण त्याचबरोबर अनेक तरुणांसाठी तो फॅशन आयकॉन देखील बनला आहे. त्यामुळे विराटचे सोशल मीडियात करोडो चाहते आहेत. ऑस्ट्रेलिया सीरीजआधी विराटनं आपला लूक काहीसा चेंज केलाय. त्यानं आपली हेअर स्टाईल बदलली आहे. याचे फोटो नुकतेच सोशल मीडियात शेअर झाले आणि बघता बघता विराटचा नवा लूक चर्चेचा विषय बनला.
हेअर स्टायलिस्टकडून व्हिडीओ शेअर
हेअर स्टायलिस्ट रशीद सलमानी यांनी विराटच्या या नव्या लूकचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. आशिया कपनंतर विराट लंडनला गेला होता. तिथून परतल्यानंतर त्यानं ही हटके हेअर स्टाईल केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कामगिरीची अपेक्षा
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पुढच्या आठवड्यात तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज झाला आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीनं भारतीय संघासाठी ही सरावाची मोठी संधी आहे. वर्ल्ड कपसाठीचा संघच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. त्यात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये विराटनं पाच सामन्यात 2 अर्धशतकं आणि एका खणखणीत शतकासह 276 धावा फटकावल्या होत्या.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या