Weight loss Mistake : वेटलॉस करत असाल तर सावधान, 141 किलो वेटलॉस करणं पडलं महागात, एक-एक करून सर्व अवयव झाले निकामी!

शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी केवळ कुरूपच दिसत नाही. तर यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याही निर्माण होतात. अशा परिस्थितीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आणि वजन कमी करणे किंवा नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. अशाच परिस्थितीत होती यूएसची फिटनेस इन्फ्लूएंसर लेक्सी रीड. लेक्सीचे वजन इतके होते की लोकांचा त्यावर विश्वासच बसणार नाही. वजन कमी करण्यापूर्वी लेक्सीचे वजन तब्बल 217 किलोग्रॅम होते. हे वजन मानवी शरीरासाठी खूप जास्त आहे. त्याचवेळी, लेक्सीने हे वजन कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली आणि अवघ्या दोन वर्षांत तिने तब्बल 141 किलो वजन कमी केले.

त्यानंतर ती लोकांसाठी आदर्श बनली. मात्र आज तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पती डॅनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. डॅनीने या पोस्टमध्ये लेक्सीचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये लेक्सी केवळ बेशुद्धच दिसत नाहीये तर तिच्या अंगावर अनेक वैद्यकीय उपकरणे लावलेली दिसतायत. याशिवाय डॅनीने एक छोटीशी नोटही लिहिली आहे ज्यामध्ये लेक्सीच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. (फोटो क्रेडिट्स: [email protected])

फिटनेस इनफ्लूएंसर लेक्सी रीडचा जिम लुक!

लेक्सी रीड आहे व्हेंटिलेटरवर

खाल्लेलं-प्यायलेलं पचवू शकत नाहीये शरीर

डॅनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या पोस्टमध्ये लिहिले आहे की, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काही आठवड्यांपर्यंत लेक्सी वारंवार आजारी पडायची आणि खाल्लेलं किंवा प्यायलेलं काहीच तिला पचवता येत नव्हतं. याव्यतिरिक्त डॅनीला हे देखील लक्षात आले की लेक्सी यावेळी खूप विचित्र पद्धतीने वागत आहे. यानंतरच डॅनीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिला आयसीयू वॉर्डमध्ये विशेष देखरेखीखाली ठेवले आहे.

(वाचा :- Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!)

शरीरातील अनेक अवयव झाले फेल

डॅनीने पुढे लिहिले आहे की, डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर हलवले आहे. यासोबतच लेक्सीचे अनेक अवयव निकामी होत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. एवढेच नाही तर डॅनीने लेक्सीला वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणले नसते तर कदाचित तिचा मृत्यू झाला असता असेही डॉक्टरांनी सांगितले. डॅनीने पुढे लिहिले की, लेक्सी सध्या डायलिसिसवर आहे आणि ती सध्या चालू देखील शकत नाही.

(वाचा :- Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!)

इंस्टाग्रामवर 1.2 मिलीयन फॉलोवर्स

-1-2-

आम्‍ही तुम्‍हाला सांगू की लेक्‍सी रीड ही यूएस मधील इंडियाना येथील एक प्रसिद्ध फिटनेस इंफ्लूएंसर आहे. तिने स्वत:ची वजन कमी करण्‍याबाबतची कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. लेक्सी 31 वर्षांची होती तेव्हा तिचे वजन तब्बल 217 किलो होते. यानंतरच तिने वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला. पण वजन कमी करणारी लेक्सी एकमेव व्यक्ती नव्हती. तर तिचा नवरा डॅनीने देखील वजन कमी केले होते.

(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)

सर्जरीद्वारे हटवली होती एक्स्ट्रा चरबी

न्यूज रिपोर्टनुसार, डॅनीचंही फिजीकल ट्रान्सफॉर्मेशन झाले होते आणि त्याने आपले वजन 94 किलोवरून 43 किलोपर्यंत कमी केले होते. याशिवाय, लेक्सीने वजन कमी केल्यानंतर तिची संपूर्ण स्किन सैल पडली होती. त्यानंतर ही अतिरिक्त चरबी काढण्यासाठी तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया जवळपास 9 तास चालली होती.

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

एक्स्ट्रा चरबी घटवणार असल्याची दिली होती माहिती!

शरीरावर अत्याचार नको

संशोधनानुसार, खूप लवकर वजन कमी केल्याने डोकेदुखी, चिडचिड, थकवा, चक्कर येणे, बद्धकोष्ठता, मासिक पाळीत अनियमितता, केस गळणे, स्नायू गळणे, अवयव निकामी होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. एका महिन्यात 1 ते 2 किलो वजन कमी करणे हे हेल्दी आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणित फिटनेस प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच वजन कमी करा. फिट, हेल्दी, निरोगी असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे पण हे साध्य करण्यासाठी लेक्सीसारखं शरीरावर अत्याचार करणं मात्र फार चुकीचं आहे. वजन कमी होणं ही गोष्ट एका रात्रीत शक्य होणारी गोष्ट नक्कीच नाही त्यामुळे त्यासाठी महिनोमहिने लागतात. पण झटपट वजन कमी करण्याच्या नादात आपण कोणतेही व्यायाम, जिममध्ये कोणतंही चुकीचं वर्कआउट, डाएट, सर्जरी डोळेझाकपणे फॉलो करत जातो जे किती जीवघेणं ठरू शकतं हे लेक्सीकडे पाहून समजू शकतं. म्हणूनच सात्विक व घरगुती आहार घ्या, 8 तास झोप घ्या, भरपूर पाणी प्या, जंक फूड खाणं सोडा, फळं-भाज्या जास्तीत जास्त खा आणि शरीराला झेपेल इतकाच व्यायाम करा. इतकं सामान्य रूटीन ठेवूनही तुम्ही सुंदर बनू शकता वेटलॉससाठी मृत्युशी खेळण्याची अजिबात गरज नाही. बरेच लोक वजन कमी करताना खाणे-पिणे देखील बंद करतात, जे खूप धोकादायक असू शकते. त्यामुळे अन्न वगळण्याऐवजी चांगले अन्न खा आणि कॅलरी कमी घ्या. वजन कमी करताना पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे सेवन करा, जेणेकरून शरीरात त्यांची कमतरता भासणार नाही. प्रथिनेयुक्त अन्न खा, म्हणजे स्नायूंची झीज होणार नाही आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

(वाचा :- Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

हेही वाचा :  Russia Ukraine War : यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की रूग्णालयात, फोटो व्हायरल

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले…

Pune Bypoll: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) …

Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच मुलगी आता डॉक्टर बनून करतेय रुग्ण सेवा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : नक्षलवाद्यांनी ज्या परिसरात केली होती वडिलांची हत्या केली मुलगी …