फिंचची ऑस्ट्रेलियन आर्मी मोहालीत, सुरु केला सराव; पाहा टीम इंडिया कधी पोहोचणार?

मोहाली, 17 सप्टेंबर: अॅरॉन फिंचचा ऑस्ट्रेलिय संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. वर्ल्ड कपआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन टी20 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यातला पहिलाच सामना खेळवण्यात येतोय तो मोहालीमध्ये. त्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सध्या मोहालीत दाखल झाला असून फिंचच्या या संघानं सरावही सुरु केला आहे. पण काही खेळाडूंचा अपवाद वगळता उर्वरित संघ लवकरच मोहालीत पोहोचणार आहे.

ऑस्ट्रेलियाची सरावाला सुरुवात

ऑस्ट्रेलियन संघानं आज मोहालीतल्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सरावाला सुरुवात केली. भारतातल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघानं लवकरच सराव सुरु केला. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिली आहे. तर स्टार्क, स्टॉयनिस आणि मिचेल मार्शनं दुखापतीमुळे विश्रांती घेणं पसंत केलं आहे.

हेही वाचा – Shubman Gill: शुभमन गिलनं गुजरात टायटन्सला केलं गुडबाय? GT फ्रँचायझीचं ट्विट Viral

दिनेश कार्तिक मोहालीत दाखल

दरम्यान भारतीय खेळाडू मोहालीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिक आज मोहालीत पोहोचला. तर रविवारपर्यंत उर्वरित संघ मोहालीत पोहोचणार आहे. उभय संघातल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतला पहिला सामना 20 सप्टेंबरला मोहालीत, दुसरा सामना 23 सप्टेंबरला नागपुरात तर तिसरा सामना 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेट कीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियन संघ – अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झॅम्पा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच …

रोहित शर्मा करतोय एकच मोठी चूक… तीन सामने, तीन पराभव अन् फक्त एकच गोष्ट ठरतेय मारक

मोहाली : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० सामन्यात सलग तीन पराभव आता पत्करावे लागले. पण या तिन्ही …