बच्चन कुटुंबाच्या 3 पिढ्या येणार एकत्र; बिग बींची नात करणार कुटुंबाची पोलखोल

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही तितकेच उत्सुक असलेले पहायला मिळतात. अशातच अमिताभ बच्चन यांच्या तीन पिढ्यांच्या कौटुंबिक कथा लवकरच चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बच्चन कुटुंबियांची जोरदार चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा फॅमिली पॉडकास्ट घेऊन येत आहे. नव्या नवेली नंदाने तिच्या पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या’चा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये तिची आजी जया बच्चन आणि तिची आई श्वेता नंदा पहायला मिळत आहेत. यामध्ये नव्या तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चन यांच्यासोबत कौटुंबिक गोष्टी शेअर करताना दिसत आहे. हा पॉडकास्ट 24 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा –  Alia Bhatt : प्रेग्नेंसीनंतर ‘या’ चित्रपटातून आलिया करणार पुनरागमन; साऊथ सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!

जया बच्चन प्रोमोचा सर्वात मजेदार भाग दिसत आहे. धाडसी आणि बोल्ड जया म्हणते, ‘माझ्याकडे लहान रहस्ये आहेत.’ ती पुढे म्हणते, ‘आजकाल प्रेमाची व्याख्या बदलली आहे. या सगळ्यासाठी माझे वय खूप झाले आहे. जया बच्चन सांगतात की, मुलगी आणि नात हे तिचे चांगले मित्र आहेत. जया पुढे मुलगी श्वेताचा पाय ओढून म्हणते, ‘ती पैसे घेण्यात माहिर आहे.’

ट्रेलरच्या कॅप्शनमध्ये नव्याने लिहिले आहे, ‘3 महिला, 3 पिढ्या, 3 धारणा. नव्याने  तिच्या 2 खास पाहुण्या श्वेता बच्चन नंदा आणि जया बच्चन यांच्यासोबत ‘व्हॉट द हेल नव्या’ शोमध्ये प्रसिद्धीपासून ते मैत्री आणि कुटुंबापर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली जाणार’. बच्चन कुटुंबातील तीन पिढ्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …