Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत आहे. बिग बींविषयीच्या खाजगी आणि वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुत असतात. ते अनेकवेळा लग्झरी लाइफमुळेही चर्चेत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगले परिसरातील नवीन घर खरेदी केलं आहे. त्यामुळे बिग बी सध्या त्यांनी खरेदी केलेल्या नव्या मालमत्तेमुळे चर्चेत आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगला परिसरात नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. येथील पार्थेनॉन इमारतीच्या 31व्या मजल्यावर त्यांनी एक आलिशान घर घेतलं आहे. या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर हे घर 12 हजार स्क्वेअर फुटचे आहे. बिग बींनी हा संपूर्ण मजला विकत घेतला आहे, ज्याची किंमतही करोडोंमध्ये आहे. हे 4 bhk अपार्टमेंट आहे, ज्याच्या बांधकामात देखील पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘पुष्पा’ची आयटम गर्ल समांथा प्रभूला झाला गंभीर आजार; उपचारासाठी गाठलं अमेरिका

पार्थेनॉन इमारतीतील या बंगल्याची किंमत जवळपास 31 कोटी रुपये आहे. मात्र, बिग बी यांच्याकडे मुंबईत त्याहूनही महागड्या मालमत्ता आहेत. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आधीच 6 बंगले आहेत. पहिला ‘जलसा’, जो सुमारे 10 हजार स्क्वेअर फूट पसरलेला आहे. या घरात तो आपल्या कुटुंबासह राहतो. दुसरा बंगला ‘प्रतीक्षा’ आहे, जिथे तो ‘जलसा’मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी आई-वडिलांसोबत राहत होता. तिसरा बंगला ‘जनक’ आहे, जिथे त्याचे कार्यालय आहे आणि चौथा बंगला ‘वत्स’ आहे. या सगळ्याशिवाय 2013 मध्येही त्यांनी ‘जलसा’च्या मागे 60 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. सहावी मालमत्ता, जी त्याने गेल्या वर्षी खरेदी केली होती.

दरम्यान, बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाइलबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. सोबतच कलाकारांच्या आलिशान घराबाबत लोकांना फारच आकर्षण असतं.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next टीम इंडियाने केली मोठी चूक, एकमेकांकडे बघत बसले रोहित-विराट-कार्तिक

Check Also

‘अगंबाई अरेच्चा’तील ती चिमुकली; ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई, 21 सप्टेंबर : दिग्दर्शक केदार शिंदे यांची मराठी नाटकं असो किंवा सिनेमा.  त्यांचा प्रत्येक …

कतरिना कैफला करायचं होतं Kiss; गुलशन ग्रोव्हर यांनी त्या सीनसाठी २ तास केलेला सराव

मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमान खान, आमिर खान, शाहरुख …