राज्य सरकारचा मोठा निर्णय : MPSC मार्फत या सरकारी पदांची भरती

राज्य मंत्रीमंडळाने सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदं आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत असा निर्णय आज राज्य सरकाराच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे अशांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

आतापर्यंत क्लर्कची वर्ग तिची पदं ही MPSC मार्फत भरण्यात येत नव्हती. यासाठी स्वतंत्र भरती घेण्यात येत होती. मात्र आता ही सर्व पदं MPSC मार्फत भरली जाणार असल्यामुळे भरती परीक्षेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही आणि मेहनती उमेदवारांना यात नोकरीची संधी मिळेल.

इतर महत्त्वाचे निर्णय
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात आता सर्टिफिकेशन कोर्सेस सुरु करणार असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
तसंच पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाजाला 28 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार असल्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Home work न केल्याने वडिलांनीच मुलाला दिली क्रूर शिक्षा; भीती दाखवण्यासाठी करायला गेला एक अन् झालं एक
Next कपटाने वागणाऱ्यांचा विनाश होईल! शैलेश लोढा यांचा असित मोदींवर पुन्हा एकदा निशाणा?

Check Also

भारतीय पोस्टमध्ये 8 वी पाससाठी भरती, 63000 पर्यंत पगार मिळेल, असे करा अर्ज | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

India Post Recruitment 2022 : भारतीय पोस्टमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी …

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 21 सप्टेंबर 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 21 September 2022 भारतीय लष्कराने सियाचीन येथे उपग्रह …