राजू यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असं आहे. त्यांचा जन्म कानपूरचा असून ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही वर्षांपूर्वी जीवे मारायची धमकी मिळाली होती. त्यांना हे कॉल पाकिस्तानतून करण्यात येत असल्याच सुद्धा सांगितलं जात होतं. त्यांना कराची आणि दुबईमधून हे डेथ थ्रेटचे कॉल येत होते. त्यांनी याविरुद्ध FIR सुद्धा दाखल केली होती.
वर्क फ्रंटवर सांगायचं तर राजू यांचं करिअर ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोमुळे सुरु झालं. त्यांनी साकारलेली गाजोडर, राजू भैया अशी अनेक पात्र खूप गाजली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत.त्यांनी आजपर्यंत तीन हजाराहून जास्त स्टेज शो केले आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. त्यांचा जन्म हा मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून त्यांना लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायची इच्छा होती.
(हे वाचा:Comedian Raju Srivastava Dies: कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा )
त्यांच्या परिवारात शिखा नावाची पत्नी तर अंतरा आणि आयुष्मान अशी दोन अपत्य सुद्धा आहेत. ते राजकीय क्षेत्रात सुद्धा बरेच सक्रिय आहेत.आपल्या स्टँडअप कॉमेडीनं प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी अनेक आयकॉनिक भूमिका निभावल्या ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बनले. प्रेक्षक आजही राजू श्रीवास्तव यांचे चाहते आहेत. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचे तरीही त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या