Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी थकीत वेतनासाठी अखेर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून २३ कोटी ६७ लाख ८७ हजार ७९९ रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले आहे. त्यामुळे वेतनविलंबाने त्रस्त शिक्षकांना नवरात्रोत्सवाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे.

नाशिक महापालिकेच्या सुमारे ८४१ शिक्षकांना दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळाल्याने या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. आता पुरवणी देयके, सातव्या वेतन आयोगाच्या फरक देयकांसाठी अनुदान मिळणे बाकी राहिले आहे. वेतन अनुदानाचा शासनहिस्सा मिळावा यासाठी नाशिक महापालिका शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने गेल्या सोमवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले होते.

या आंदोलनावेळी शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अनुदान प्राप्त झाल्याने शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. महापालिका शाळांतील शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांचे वेतन शासनाकडून मिळणारा वेतन अनुदान हिस्सा न मिळाल्याने थकले होते. याशिवाय विभागातील महापालिकांसह नगर परिषदा, नगरपालिक शाळांतील निवृत्त शिक्षकांचे वेतनही रखडलेले होते.

या वेतनविलंबाने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाल्याने अखेर नाशिक महापालिका शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक मोतीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे आणि विविध शिक्षक संघटनांच्या उपस्थितीत १२ सप्टेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार, शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याच्या तयारीत
NEP: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी दूरच
या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतल्याने विभागातील महापालिका शाळांतील शिक्षकांच्या जुलै आणि ऑगस्टच्या थकीत वेतनासाठी, तर नगर परिषदा, नगरपालिका आणि महापालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या ऑगस्ट महिन्याच्या थकीत वेतानासाठी अनुदान वर्ग केले.

वेतन अनुदानाच्या प्रश्नावर नाशिक मनपा शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढलेल्या मोर्चाची प्रशासनाने दखल घेतल्याने थकीत वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला. माध्यमांचे सहकार्य देखील हा प्रश्न मार्गी लागण्यात महत्वाची ठरले. यापुढे आंदोलनाची वेळ येऊ नये.
-ईश्वर चव्हाण, सदस्य, शिक्षक संघटना समन्वय समिती

‘गृहपाठ बंद करण्याचा घातकी निर्णय घेण्याचे सल्ले कोणते तज्ज्ञ देतात?’

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …

MahaGenco Job:महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बंपर भरती, मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी

MahaGenco Recruitment: विद्युत वितरण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती …