दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. डोंबिवलीतील ब्लॉसम इंटरनशनल स्कूलने यावर टर्म बुकची संकल्पना राबविली आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे शक्य होणार असल्याचा दावा शाळेच्या मुख्याध्यापिका नीरजा पाटील यांनी केला आहे.

जनरल एज्युकेशन इन्टिट्युशन दादर या शिक्षण संस्थेची डोंबिवलीतील पहिली शाळा असलेल्या स. वा. जोशी संकुलातील जीईआय ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक मिनी ऑडिटोरिअम उभारण्यात आले आहे. या ऑडिटोरिअमचे उद्घाटन प्रख्यात सर्जन डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेदेखील यावेळी उपस्थित होते.

यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेने राबविलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. शाळेने मुख्य विषयाचे एकत्रित टर्म बुक निवडले आहे. २०० पानांऐवजी १०० पानांच्या सॉफ्ट कव्हर नोट बुक्सचा वापर करण्याबरोबरच रोजच्या वेळापत्रकात बदल करत एकाच विषयाच्या एकाऐवजी दोन तासिका घेतल्या जाणार असून पालकांनीदेखील कमी पाणी मावेल अशी छोटी बाटली द्यावी. शाळेत मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार असल्याचा शाळेचा दावा आहे.

आधुनिक शिक्षण प्रणालीचा पुरस्कार करत चालवल्या जाणाऱ्या या शाळेत एसएससी बोर्डाबरोबरच ब्लॉसम इंटरनॅशनल ही सीबीएससी बोर्डाची शाळादेखील २०१२ पासून चालवली जात असून या शाळेला पालक आणि विद्यार्थ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच शाळेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑडिटोरिअमचा लाभ शाळेबरोबरच आजूबाजूच्या संस्थांना होणार असून कमी खर्चात हे १५० क्षमतेचे सभागृह उपलब्ध होऊ शकणार आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

MahaGenco Job:महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बंपर भरती, मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी

MahaGenco Recruitment: विद्युत वितरण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती …