रुपाली भोसले पुन्हा दिसणार बिग बॉस मराठीत? अभिनेत्रीनं केली मोठी घोषणा

मुंबई,  10 सप्टेंबर: कलर्स मराठीवरील सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. सध्या सर्वत्र याच शोची चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठी 4 ची घोषणा झाली आहे. शो कधी सुरू होणार हे देखील येत्या काही दिवसात समजणार आहे. पहिल्या तीन सीझननं टेलिव्हिजनवर धुमाकूळ घातला. जबदरस्त स्पर्धकांनी बिग बॉसचं घर हलवून टाकलं होतं.  आता बिग बॉस मराठी 4मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनेक कलकारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अशातच एका अभिनेत्रीनं मोठा खुलासा केला आहे. ती म्हणजे बिग बॉस मराठी 2 ची तगडी स्पर्धक रुपाली भोसले. अभिनेत्रीला बिग बॉस मराठी 4 मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता दाखवली आहे.

रुपाली भोसले सध्या स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत काम करत आहे. मालिकेतील संजना तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.  प्रेक्षकांकडूनही संजनाला प्रचंड प्रेम मिळत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. रुपालीनं तिला बिग बॉस मराठी 4मध्ये गेस्ट म्हणून यायचं आहे असं सांगितलं आहे.  तिच्या या इच्छेनंतर सर्वत्र चर्चा रंगल्या असून रुपालीला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

हेही वाचा – Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मालिकेच्या यशाचं कारण माहितेय का? मिलिंद गवळींनी केला खुलासा

रुपालीनं इन्स्टाग्रमावर ‘विचारा प्रश्न’ हा गेम खेळला होता. त्यात तिला तिच्या चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात एका चाहत्यानं तिला ‘बिग बॉस मराठी 4 मध्ये गेस्ट अपिरिअन्स करायला आवडेल का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत रुपाली भोसले ‘हो’ असं म्हणाली.  रूपालीच्या उत्तरानंतर अनेकांनी तिला असं न करण्याचा सल्ला दिला आहे. कमेंट्मध्ये ‘रुपाली आई कुठे काय करते मालिकेतच छान दिसतेय’, असं म्हटलं देलं आहे.

बिग बॉस मराठी 4 मध्ये दिसणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची यादी समोर आली आहे. ज्यात अभिनेता हार्दीक जोशीचं नाव टॉपमध्ये आहे. बिग बॉस मराठीच्या भव्या दिव्य घराचं काम अजून सुरू आहे. महेश मांजरेकर शो होस्ट करणार आहेत. काही दिवसातच ते शोची तारीख जाहीर करतील. बिग बॉसच्या स्पर्धकांबरोबर मांजरेकरांनी खास प्रोमो देखील शूट केल्याचं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO: फिल्मफेअरच्या स्टेजवरच रणवीर सिंहला कोसळलं रडू; नेमकं काय घडलं?

मुंबई, 10 सप्टेंबर-   67  वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा नुकतंच पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांचा गौरव …

‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट

मुंबई, 10 सप्टेंबर-   आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज …