या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणत आहे, ‘माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, आणि घडत आहे. ते माझ्या विचारांच्या पलीकडे आहे. मला आजही विश्वास बसत नाही की मी बॉलिवूडचा एक भाग आहे. खरंच मला विश्वास बसत नाही की मी आता एक अभिनेता बनलो आहे. माझ्यासाठी हे सर्वकाही एखाद्या गोड स्वप्नासारखं आहे. हा संवाद साधताना रणवीर सिंह भावुक होतो. आणि त्याला व्यासपीठावरच रडू कोसळतं.
पुढे बोलताना रणवीर म्हणाला, ‘मी सर्वात आधी, प्रेक्षकांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण आज त्यांच्यामुळे मला माझं स्वप्न जगायला मिळत आहे. त्यांच्या प्रेमामुळे इथे पोहोचलो आहे. शिवाय अभिनेत्याने आपल्या आईवडिलांचे आभार मानत म्हटलं, मी आज जो कुणी आहे, तो माझ्या आईबाबा आणि बहिणीमुळे, ते माझ्यासाठी देवासमान आहेत. मी जे काही आहे ते माझ्या या देवामुळे. आणि मी आज जे काही करत आहे ते या देवासाठी. असं म्हणत अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(हे वाचा:Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका पादुकोण बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट )
सोबतच अभिनेत्याने आपली पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणला आपल्या घरची लक्ष्मी म्हटलं आहे.तसेच दीपिका आपली ताकत असल्याचंही म्हटलं आहे. रणवीर पुरस्कार घेताना, बॅक स्टेजला जाऊन दीपिकाला हात धरुन सर्वांसमोर घेऊन येतो. आणि अगदी रोमँटिक होत अभिनेत्रीला किस करत आपल्या भावना व्यक्त करतो. रणवीर सिंहचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या