‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहेत. आणि चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार यांनी सांभाळली आहे. मात्र चित्रपटाच्या मुख्य नायिकेची घोषणा अद्याप झालेली नाही. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
अभिनेत्री जेनिफर विंगेट कार्तिक आर्यन स्टारर ‘आशिकी 3’मध्ये मुख्य भूमिकेत असल्याच्या चर्चांवर आता दिग्दर्शक अनुराग बसूने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंडिया फोरमला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, “मीसुद्धा या अफवांबाबत ऐकत आहे. परंतु, प्रामाणिकपणे सांगायचं तर, आम्ही सध्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. आम्ही सध्या चित्रपट निर्मितीच्या इतर विविध पैलूंबाबत विचार करत आहोत. अजून इतर कलाकारांची निवड झालेली नाहीय. त्यांचा शोध सुरु आहे. तुमच्याप्रमाणे या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कुणाची निवड होते याची आम्हालाही उत्सुकता असल्याचं अनुराग यांनी म्हटलंय.
(हे वाचा:Kartik Aryan च्या हाती लागला आणखी एक चित्रपट, पडद्यावर करणार ‘आशिकी’ )
चित्रपटातबाबत सांगायचं तर, कार्तिक आर्यनने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आशिकी 3′ चा मोशन पोस्टर रिलीज करत सर्वांना चकित केलं होतं. हा चित्रपट 1990 च्या ”आशिकी’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर झळकले होते. पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भागदेखील प्रचंड हिट ठरला होता. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या