वर्षा उसगावकरांनी कोळी समाजासमोर जोडले हात; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई, 7 सप्टेंबर-   मराठीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना ओळखलं जातं. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आपला एक वेगळा ठसा उमठवला आहे. सध्या त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहेत. त्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. परंतु यावेळी त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. वर्षा उसगावकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली आहे.

वर्षा उसगावकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ऑनलाईन कंपनीबाबत बोलताना काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील. तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणतंही हेतू नव्हता. आणि मला कोळी समाजाचा नितांत आदर आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांची हात जोडून माफी मागते’. असं म्हणत वर्षा उसगावकर यांनी माफी मागत या वादावर पडदा टाकला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण-
वर्षा उसगांवकर यांनी एका मासे विक्रेत्या कंपनीचं प्रमोशन केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोळी महिला विक्रेत्यांचा चांगलात संपात झाला होता. वर्षा उसगांवकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिने सृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि यातून गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत असल्याचं अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील म्हटलं आहे. सोबतच त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता.

(हे वाचा:Varsha Usgaonkar : ‘माफी मागा नाहीतर सडलेले मासे खाऊ घालू’ ; वर्षा उसगांवकरांना प्रमोशन पडलं महागात )
सोबतच ती जाहिरात साईटवरुन हटवण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नयना पाटील यांनी दिला होता. इतकंच नव्हे तर वर्ष उसगावकर यांनीही माफी मागावी अन्यथा त्यांना मालिकेच्या सेटवर जाऊन सडलेले मासे खायला घालू असा तीव्र इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता वर्षा उसगावकर यांनी व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

ब्रेस्ट आणि ओठ छोटे आहेत… मराठमोळ्या अभिनेत्रीला हे कारण देत सिनेमातून दाखवला होता बाहेरचा रस्ता

मुंबई: दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte Birthday) १७ वर्षांहून अधिक …

आलिया-रणबीर कपूरला महाकालच्या दर्शनासाठी विरोध,हिंदू संघटनांच्या आंदोलनामुळे वाद

उज्जैन : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना महाकाल मंदिर दर्शन मिळालं नाही. दर्शनासाठी आलेल्या …