तर वर्षा उसगांवकरांना सडके मासे खाऊ घालू, बदनामी केल्यानं कोळी महिला संतापल्या
काय म्हणाले जयवंत वाडकर-
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत जयवंत म्हणाले की, ‘मी स्वतः एक कोळी आहे. वर्षा जेव्हा पहिल्यांदा गोव्यावरून आली तेव्हा सर्वातआधी तिने माझ्यासोबतच ‘कार्टी प्रेमात पडली’ हे नाटक केलं होतं. एका जाहिरातीसाठी ती असं म्हणाली की, ‘कोळी लोक आम्हाला फसवतात आणि आम्हाला घाणेरडे मासे देतात.’ हे विधान अत्यंत चुकीचं आहे. कोळी माणूस असं कधीच करत नाही. तो दिलदार आहे.. तो जे काही करतो ते मनापासून करतो. आज सरकार बंदरं बंद करत असताना आम्ही कष्टाने सर्व काही काम करत आहोत. शिवाय त्या अॅपला मासे कोण पुरवतं? त्यांना आमच्याकडूनच मासे घ्यावे लागतात.’
ते जे तुम्हाला मासे स्वच्छ आणि फ्रेश करून देतात तेही दोन- तीन दिवस पूर्वीचेच असतात हे लक्षात घ्या. ‘यम्मीली’ ने (yummyli) तातडीने वर्षा उसगांवकरची जाहिरात काढून टाकावी आणि एक वेगळी जाहिरात करावी. जर हे झालं नाही तर यम्मीलीला पुढे अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कारण तुम्हाला आम्हीच मासे पुरवणार आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही ठरवलं तर एकही मासा तुम्हाला देणार नाही. यासोबतच या प्रकरणाची शासनाने नोंद घ्यायला हवी.’
तिरुपती बालाजी मंदिरात अभिनेत्रीसोबत गैरव्यवहार? रडत-रडत शेअर केला Video
नक्की काय आहे प्रकरण-
‘मला मासे खायला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत. बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले.’ असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.
लावणी ही आपली ओळख, लावणीला वेगळ्या नजरेने पाहू नका, ट्रोल करू नका | अमृता खानविलकर
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या