Oscar 2023:साऊथच्या ‘RRR’चा बोलबाला पण भारताकडून ऑस्करसाठी छेल्लो शोची एण्ट्री

मुंबई, 20 सप्टेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऑस्कर 2023 ची जोरदार चर्चा सुरु असलेली पहायला मिळत आहे. पुढच्या वर्षीच्या ऑस्करसाठी अनेक चित्रपटांच्या नावांची चर्चा रंगली होती. अखेर 2022 मध्ये परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी भारतातून कोणता चित्रपट अधिकृतपणे जाणार आहे, हे उघड झाले आहे. साऊथ चित्रपटांच्या नावाचा बोलबाला असताना ऑस्कर 2023च्या शर्यतीत गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

भारत सरकारने जाहीर केले आहे की गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ ला ऑस्कर पुरस्कार 2023 साठी भारताकडून अधिकृत प्रवेश आहे. दिग्दर्शक पान नलिन यांचा गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात किशोरवयीन मुलाच्या रुपेरी पडद्यावरील स्वप्नांची कथा आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाला वॅलाडोलिड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्ड स्पाइक पुरस्कार मिळाला होता.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाज ज्युरी, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवर्षी देशातील सर्व भाषांमधील निवडक चित्रपटांपैकी एक चित्रपट पाठवते. या चित्रपटांपैकी कोणतेही पाच चित्रपट अंतिम टप्प्यात पोहोचतील आणि या पाच चित्रपटांना ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी नामांकन दिले जाते.

दरम्यान, गुजराती सिनेमा छेल्लो शो हा भारताकडून ऑस्कर 2023 साठी अधिकृत एन्ट्री असणार आहे. या चित्रपटात भाविन राबरी, भावेश श्रीमाळी, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटांचाही ऑस्कर 2023 च्या या यादीत समावेश आहे . पण, ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाने दोन्ही चित्रपटांना बाजी मारत ऑस्करमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next लोकेश राहुलचा सिक्सर बघून तुम्हीही म्हणाल… ‘व्हॉट अ शॉट!’, पाहा Video

Check Also

तब्बल 10 वर्षांनीही ‘संग्राम शेठ’ प्रेक्षकांच्या आठवणीत

मुंबई, 21 सप्टेंबर : स्टार प्रवाह वाहिनी सध्या मराठी टेलिव्हिजन विश्वात सर्वात आघाडीची वाहिनी ठरली …

राखीला साथ दिल्याची सिंधूला भोगावी लागणार मोठी शिक्षा; मालिकेत मोठा ट्विस्ट

मुंबई, 21  सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील मालिका ‘लग्नाची बेडी’ चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील …