(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)
लवकर झोपायला जा आणि लवकर उठा
ऋजुता दिवेकर सांगतात की, शरीर निरोगी असेल तर सौंदर्य स्वतःच टिकून राहते. त्यामुळे शरीर सुंदर ठेवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवणे आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती राखणे आवश्यक आहे. रोग प्रतिकारशक्ती राखण्याचा पहिला मार्ग म्हणजे लवकर झोपणे आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठणे. यासाठी ऋजुता दिवेकर दररोज वेळेवर झोपण्याचा सल्ला देतात. तुम्ही तुमच्या झोपेची एक वेळ निश्चित करा आणि त्यानुसार दररोज पूर्ण झोपा.
(वाचा :- World Coconut Day: नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे आश्चर्यकारक फायदे,आता टॅनिंगची समस्या होणार कायमची दूर)
जेवणाची वेळ टाळू नका
ऋजुता म्हणते की दररोज योग्य वेळी अन्न खा आणि तिन्ही वेळा खा. ऋजुताच्या या सल्ल्यामागील कारण म्हणजे अन्न टाळण्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. याचा चयापचय आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्वचेच्या ग्लोवरही परिणाम होतो.
(वाचा :- पार्लरमध्ये जायला वेळ नाही? मग या साणांच्या दिवसात घरीच करा मेनिक्युअर, जाणून घ्या प्रत्येक स्टेप)
रोज व्यायम करा
ऋजुता म्हणतात की तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दररोज व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. परंतु हे आवश्यक नाही की तुम्ही दररोज तोच व्यायाम किंवा योग करा. जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर काहीतरी नवीन करून पहा. पण व्यायाम करा. त्यामुळे फिटनेसही वाढतो आणि त्वचा चमकदार राहते.
(वाचा :- गेलेले केस पुन्हा येतील व हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितले केसांसाठी 3 घरगुती पदार्थ)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या