‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये दीपिका बनणार रणबीरची आई? ‘या’ सीनवरून मिळाली मोठी हिंट

मुंबई, 10 सप्टेंबर-   आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ काल चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना रणबीर आणि आलियाला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागून होती. ही प्रतीक्षा आता संपुष्ठात आलिया आहे. चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग आहे. पहिला भाग रिलीज होताच चाहत्यांना आता दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा’ असं आहे. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग 2- देव’ असं आहे. चित्रपटाचा पहिला भाग हा शिवा (रणबीर कपूर ) नावाच्या मुलावर अर्थातच आधारित आहे.त्याच्याकडे काही दैवी शक्ती असतात. त्याच्याकडे एक ‘अस्त्र’ असतं. त्या शक्तीच्या आधारे त्याला पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. तो या शक्तीच्या आधारे या जगाचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये दडलेल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागाचा शेवट फारच रंजक आहे. कारण यामध्ये दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केलेली आहे.

‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग पाहणाऱ्यांना आता याच्या दुसऱ्या भागाची ओढ लागली आहे. दुसऱ्या भागात नेमकं काय घडणार. आणि कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोणची निवड केली जाऊ शकते.असं सांगितलं जात आहे.बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारणार आहे. कारण ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ मधील एका दृश्यात ती अस्पष्टपणे दिसून आली आहे.


(हे वाचा:Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी )
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात मोठ्या प्रमाणात VFX ची दृश्ये पाहायला मिळाली आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर शिवा तर आलिया भट्ट ईशाच्या पाहायला मिळत आहे. सोबतच या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारच्या बोलण्यातून मिळाली ‘फिर हेरा फेरी 3’ची हिंट

मुंबई, 10 सप्टेंबर: अक्षय कुमारने शुक्रवारी त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. 9 सप्टेंबरला सुनील …

मुंबईच्या रस्त्यांवर सईचा कॅटवॉग; बॉयफ्रेंडच्या आयडियानं आणली रंगत

मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत आहे. सिनेमा आणि आता …