सईनं फिल्मफेअरच्या खास लुकमध्ये फोटोशूट केलंच ते सोशल मीडियावर व्हायरलही झालं पण त्याहून जास्त सईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘ड्रिम ऑन’ म्हणतं सईनं तिचा मुंबईच्या रस्त्यावरील कॅट वॉक करताना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सई तिच्या खास अँटीट्यूटमध्ये स्वप्ननगरी मुंबईच्या रस्त्यावर वॉक करतेय. त्यावर सईच्या आवाजातील काही सुंदर ओळी देखील तिनं रेकॉर्ड केल्या आहेत. ज्यात तिनं “Dreams Are Strange” या थीमवर काही सुंदर लाईन्स म्हटल्या आहेत. मागे सुंदर म्युझिक देखील वाजताना दिसत आहे. व्हिडीओ सईच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.
हेही वाचा – Sai Tamhankar : ‘ती आली, तिने स्वप्न पाहिलं आणि ती जिंकली’; सईच्या बॉयफ्रेंडची खास पोस्ट चर्चेत
बॉयफ्रेंडनं दिला कानमंत्र
सईनं मुंबईच्या रस्त्यावर कॅटवॉक केला. त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. मात्र या भन्नाट व्हिडीओची आइडिया सईला तिचा बॉयफ्रेंड अनिश जोग यानं दिली आहे. सईनं स्वत: पोस्टमध्ये त्याचे आभार मानले आहेत. सोबत हार्ट इमोजी शेअर करत प्रेमही व्यक्त केलं आहे. सई आणि अनिश गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
सईला फिल्मफेअर मिळाल्यानंतरही अनिशनं तिचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. अनिशनं सईचा हातात ब्लॅक लेडी पकडलेला फोटो शेअर करत म्हटलं होतं, ‘तिनं हे यश प्राप्त करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे. दीर्घकाळापासून या यशाचं स्वप्न पाहिलं आहे. ती सर्वात उत्तम आहे आणि कायम असणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या