सिनेमात न घेण्यासाठी सई ताम्हणकरला दिलं होतं विचित्र कारण
बॉयकॉट ट्रेंडचा विळखा पार करत या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३५ कोटींचा गल्ला जमवला. या प्रतिक्रियांच्या मांदियाळीत बिनधास्त बोलणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाष्य केलं आहे. कंगनाने या सिनेमावर निशाणा साधत अयान, करण, रणबीर आणि आलिया यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. वाचा नेमका काय म्हणतेय कंगना
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ब्रह्मास्त्र सिनेमाविषयीची तिची प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं असं लिहिलं आहे, ब्रह्मास्त्र सिनेमातील व्हीएफएक्स शॉट हे भयावह आहेत. अंगावर शहारे नव्हे तर डोकेदुखी देणारे आहेत. खोटं विकण्याचा प्रयत्न केला ही हे असंच होतं. लोक रणबीर आणि आलिया यांना चांगले कलाकार मानतात तर अयानला हुशार म्हणतात, मग ६०० कोटी वाया घालवणारा सिनेमा त्यांनी कसा काय बनवला. त्यांनी आयुष्यात कधीच चांगला सिनेमा बनवला नाही. यांच्यामुळे करणला त्याचा स्टुडिओ विकावा लागेल.
कंगना यावरच थांबलेली नाही तर तिने ब्रह्मास्त्र सिनेमा एक ग्रुपिझम आहे. सगळं मॅनेज करून या सिनेमाची चर्चा घडवली आहे. बेईमानी करूनही एक चांगला सिनेमा करता आलेली नाही. अयान मुखर्जी याच्यावरही कंगनाने टीका केली आहे. ती म्हणते की, त्याने या सिनेमासाठी १२ वर्ष घालवली, १४ डीओपी बदलले, ४०० दिवस शूटिंग केलं आणि ६०० कोटी वाया घालवले.
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये करण जोहरलाही सोडलं नाही. करणला नेहमी इतरांच्या खाजगी आयुष्यात फार रस असतो. सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा त्याला दुसऱ्यांच्या सेक्स लाइफमध्ये आवड आहे. हे करणनेही मान्य केलं आहे. या सिनेमाच्या रिव्ह्यूजपासून तिकिटंही खरेदी केली गेली आहेत. आता मात्र सगळे पुजारी होऊन फिरत आहेत.
श्रेयस तळपदेचा आलियाला सल्ला, ‘प्रेक्षक प्रेयसीप्रमाणे असतात’
नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी लक्ष वेधणाऱ्या कंगनाने ब्रह्मास्त्र या सिनेमावर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे. यावर सध्या तरी अयान किंवा करण यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. कंगनाचा धाकड हा सिनेमा फ्लॉप झाला होता तेव्हा तिच्यावरही अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आता तिचा इमर्जन्सी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे ज्यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका केली आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या