ब्रह्मास्त्र पाहताना तुमच्याही नजरेतून सुटली असेल ही गोष्ट, दुसऱ्या भागात दीपिका साकारणार रणबीरची आई?

मुंबई: आलिया भट्ट, रणबीर कपूर, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि शाहरुख खान स्टारर सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra Part 1: Shiva) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रदर्शनानंतर आज दुसऱ्या दिवशीही सिनेमाने चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी ०९ सप्टेंबर रोजी एका दिवसांत सिनेमाने ७५ कोटींचा आकडा गाठला आहे.

सोशल मीडियावर या सिनेमाच्या मेकर्सनी आणि कलाकारांनी चाहत्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू असतानाच ‘ब्रह्मास्त्र भाग १: शिवा’ या सिनेमाने आश्चर्यकाररित्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अर्थात अजूनही प्रेक्षकांकडून ‘ब्रह्मास्त्र’बाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.


या सर्वादरम्यान सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. ब्रह्मास्त्र भाग १: शिवा’च्या शेवटीच दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. या दुसऱ्या भागाचे नाव ‘ब्रह्मास्त्र भाग २- देव’ (Brahmastra Part 2: Dev) असे असणार आहे. अर्थात शिवाची कहाणी सांगितल्यानंतर दुसऱ्या भागात देव-अम्रिताची कहाणी पाहायला मिळणार आहे. आता देव आणि अम्रिता कोण आहे हे ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भाग पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल!

हे वाचा-जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत हृतिकची अशी वागणूक; फॅनला सर्वांसमोर सुनावलं

दरम्यान ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शिवाची (रणबीर कपूर) कहाणी दाखवण्यात आली आहे. सर्वश्रेष्ठ अस्त्र असणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ची रक्षा करणाऱ्या ब्रह्मांशपैकी शिवा एक असतो. अतिशय रंजकरित्या त्याला त्याच्या अस्तित्वाबाबतची ही गोष्ट समजते. या प्रवासात त्याची प्रेयसी इशा (आलिया भट्ट) त्याच्यासोबत असते. तो स्वत:च एक अस्त्र असल्याची माहिती त्याला गुरुजी (अमिताभ बच्चन) देतात, तो स्वत: अग्निअस्त्र असतो. तो वाईट शक्तिंचा नाश करण्यासाठी, त्यांच्या हाती ब्रह्मास्त्र लागू नये याकरता स्वत:च्या अग्नीअस्त्राचा वापर कसा करायचा हे शिकून घेतो. या प्रशिक्षणादरम्यान त्याला त्याचे आई-वडील कोण आहे हेही समजते.

हे वाचा-Video: रणबीरनंतर ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाचं ‘बीफ प्रेम’; विवेक अग्निहोत्री ट्रोल

दीपिका साकारणार रणबीरची आई?

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शिवाच्या आई-वडिलांची भूमिका कोण साकारतंय हे दाखवण्यात आलं नसलं तरी त्यांची झलक नक्कीच दिसते आहे. एक दृश्य असे आहे की बाळ असणाऱ्या शिवाला त्याच्या आईने उचलून घेतले आहे. ज्या महिलेने शिवाला उचलून घेतले आहे, ती दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्याचे बोलले जाते आहे. सोशल मीडियावर झुम करून दाखवत या सीनचे फोटोही शेअर केले जात आहेत. त्यावरुन ही दीपिकाच असल्याचा भास होतो. चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास दीपिका ‘ब्रह्मास्त्र भाग २- देव’मध्ये शिवाची भूमिका साकारणाऱ्या रणबीरच्या आईची भूमिका साकारू शकते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा केला जातो आहे की, ही बाब प्रेक्षकांच्या नजरेतून सुटली. ती दीपिकाच असल्याचे सर्वच थिएटर स्क्रिनवर स्पष्ट दिसत नसल्याचे बोलले जाते आहे. आता दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतरच सत्य काय ते समोर येईल.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

अखेर प्रतिक्षा संपली! या तारखेला सुरु होणार Bigg Boss Marathi चा चौथा सीझन

मुंबई, 10 सप्टेंबर: लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत …

नाहीतर तुझी *** काढून…; आऊंनी मॅनेजरकडून असे वसूल केले होते कामाचे पैसे

मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील असे काही तारे ज्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य …