‘वन लायनर गोष्ट ऐकल्यावर मी सुन्न झालो!’; किरणच्या आयुष्यात असा आला ‘देवमाणूस’

मुंबई,  10 सप्टेंबर : झी मराठीवरील अशा फार कमी मालिका आहेत ज्या अनेक वर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यातील एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. ही मालिका देखील झीच्या जुन्या मालिकांप्रमाणेच प्रेक्षकांच्या अनेक वर्ष लक्षात राहिलं. ‘देवमाणूस’ आणि ‘देवमाणूस 2’ या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांची मन जिंकली. एक वेगळा विषय यानिमित्तनं झी मराठीवर पाहायला मिळाला. पण मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आज म्हणजेच 10 सप्टेंबरला देवमाणूस 2 ही मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. देवमाणूस म्हणजेच अजित कुमारची दमदार भूमिका निभावणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजेच किरण गायकवाड. किरणनं दोन्ही सीझनमध्ये उत्तम काम केलं. वेळी प्रेक्षकांनी अजितकुमारला शिव्या देखील घातल्या पण हिची त्याच्या कामाची पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही. किरणच्या आयुष्यात देवमाणूस ही मालिका फार महत्त्वाची आहे. अभिनेत्याला ही मालिका कशी मिळाली याची आठवण त्यानं आज मालिकेच्या शेवटच्या दिवशी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

किरणनं पोस्ट शेअर करत मालिकेचा शेवटचा सीन शुट केल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किरणसह मालिकेतील कलाकार भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सगळे कलाकार आणि मालिकेची निर्माती श्वेता शिंदे देखील रडताना दिसत आहे. किरणनं पोस्ट शेअर करत म्हटलंय, ‘दिनांक 24 जुलै 2020 ला मला साधारण 2:15 च्या आसपास एक फोन येतो श्वेता शिंदे मॅडम असा डिसप्ले वर दिसतं. थोडास कचरतच (ही जरा आदरयुक्त भीती होती आणि आताही आहे ) मी फोन उचलला. काय करतोएस वैगेरे तत्सम बोलण झाल.मॅम म्हणल्या आपण एक शो करतोय ज्याचा हीरोच विलन आहे.  जो खूप वाईट काम करतो आणि गावातली माणस त्याला देवमाणूस म्हणत असतात.
हेही वाचा – Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मालिकेच्या यशाचं कारण माहितेय का? मिलिंद गवळींनी केला खुलासा

मालिकेची ही वन लाइन ऐकूनच किरण सुन्न झाला होता. त्यानं पुढे म्हटलंय, ‘मला वाटला हा बाबा गावतला कोणीतरी एखादा रोलसाठी असेल काही तरी. मी म्हणालो मस्त आहे विषय वैगेरे हळूच विचारलं मी काय करायचय यात ?मॅम म्हणल्या मेन लीड “देवमाणूस”. झाल संपल सगळं पुढे अर्धा मिनिट तर मी शांतच होतो काहीच कळत न्हवतं वन लायनर गोष्ट आईकल्यावर तर मी सुन्न होतो’.

किरण गायकवाडनं याआधीही निर्माती श्वेता शिंदे आणि वज्र प्रोडक्शनच्या लागीर झालं जी मालिकेत काम केलं होतं. त्या मालिकेतही किरण विलनच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर देवमाणूस ही त्याच्या करिअरमधील फार मोठी संधी होती. देवमाणूसमुळे किरण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. सगळ्यांचे आभार मानले आहेत. शेवटी भावूक होत ‘देवमाणूस संपलय आणि आता पुन्हा वज्र मधून मला देवमाणूस साठी कॉल टाइम नाही येणार जो की मे खूप मिस्स करणार आहे’, असं किरणनं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

ब्रह्मास्त्र पाहताना तुमच्याही नजरेतून सुटली असेल ही गोष्ट, दुसऱ्या भागात दीपिका साकारणार रणबीरची आई?

मुंबई: आलिया भट्ट, रणबीर कपूर, मौनी रॉय, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि शाहरुख खान स्टारर सिनेमा …

रस्त्यावरच रॅम्प वॉक करतेय सई ताम्हणकर; म्हणाली- स्वप्न कधीतरी खरी होतातच!

मुंबई: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar Video) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. …