आशिया चषक स्पर्धेच्या फायनलपूर्वी वसिम अक्रमचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वसिम अक्रम हा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशनाकाला काही महत्वाच्या टिप्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंकेतील आणि दुबईतील खेळपट्टी यामध्ये कसा आणि किती फरक आहे, हे वसिमने त्याला सांगितले. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इन स्विंग करता तेव्हा खेळाडूला ते मारणे किती सोपे असते आणि जेव्हा आऊट स्विंग करता तेव्हा तुम्हाला फलंदाजाला कसं जखडून ठेवता येऊ शकतं. या सर्व गोष्टी वसिम दिलशानला संमजून सांगत होता. पण आशिया चषका फायनलच्यापूर्वी वसिमने हे सर्व सांगितल्यामुळे आता पाकिस्तानच्या फलंदाजांचे काय होणार, याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे.
वसिम हा पाकिस्तानचा एक महान गोलंदाज होता. पाकिस्तानचे कर्णधारपदही त्याने भुषवले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजीबाबत त्याला सखोल माहिती आहे. त्याचबरोबर त्यांना लवकर कसं बाद केलं जाऊ शकतं, हे एक महान गोलंदाज म्हणून त्याला चांगलंच माहिती असेल. त्यामुळे फायनलपूर्वी वसिमचे हे मार्गदर्शन दिलशानला किती उपयोगी पडतं हे पाहावे लागेल. कारण आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात फायनल होणार आहे. या सामन्यात दिलशानही खेळेणार आहे. जर दिलशानने चांगली कामगिरी केली, तर वसिम पाकिस्तानच्या चाहत्यांकडून ट्रोल होऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात कोणात संघ जिंकतो आणि दिलशानची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पण वसिमने एक खेळाडू म्हणून दिलशानला मदत केली आहे, हेदेखील विसरून चालणार नाही. कोणत्याही खेळात या गोष्टी घडत असतात, त्यामुळे वसिमने जे मार्गदर्शन केले ते चुकीचे आहे, हे म्हणजे उचित ठरणार नाही.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या