‘फ्युचर विराट कोहली’ पाहिलात का? डोमेस्टिक क्रिकेटमध्ये करतोय भन्नाट कामगिरी

पुद्दुचेरी, 10 सप्टेंबर: विराट कोहलीनं नुकतच आशिया चषकात विक्रमी शतक ठोकलं. विराटच्या गेल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील आजवरच्या शतकांपैकी दुबईच्या मैदानातलं ते शतक खास होतं. कारण गेले काही काळ फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराटच्या बॅटमधून निघालेलं तीन वर्षानंतरचं पहिलं शतक होतं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71 वं. गेली 14 वर्ष विराटनं भारतीय क्रिकेटला बरंच काही दिलं आहे. याच विराटच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक युवा खेळाडू देशात तयार होतायत. दिल्लीचा यश धुल हा त्या युवा खेळाडूंपैकीच एक. टीम इंडियाचा भविष्यातला हा विराट कोहली सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक कारनामे करतोय.

दुलीप ट्रॉफीत यश धुलची कमाल

सध्या सुरु असलेल्या यंदाच्या डोमेस्टिक सीझनमधल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत यश धुल नॉर्थ झोनचं प्रतिनिधित्व करतोय. स्पर्धेतल्या पहिल्याच सामन्यात धुलनं ईस्ट झोनविरुद्ध तब्बल 193 धावांची खेळी केली. 243 चेंडूं खेळताना त्यानं 28 चौकार आणि दोन षटकार ठोकले. यश धुलचं द्विशतक थोडक्यात हुकलं असलं तरी पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी खेळताना शतक ठोकण्याचा पराक्रम मात्र त्यानं गाजवला.

अंडर-19 विश्वविजेता कर्णधार

यश धुलनं यंदाच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिलं होतं. भारतानं अंडर नाईन्टिन वर्ल्ड कपमध्ये मिळवलेलं ते पाचवं विजेतेपद ठरलं होतं. महत्वाची बाब ही की विराट कोहलीच्या नेतृत्वातही 2008 साली भारत अंडर नाईन्टिन विश्वविजेता ठरला होता.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी

अवघ्या 19 वर्षांच्या यश धुलनं यंदाच्या रणजी मोसमात आपल्या दमदार फलंदाजीनं छाप पाडली. त्यानं रणजी पदार्पणात दोन्ही डावात शतकं ठोकली. तर एका सामन्यात द्विशतकही साजरं केलं. आणि आता दुलीप ट्रॉफीतही पदार्पणात 193 धावांची खेळी केली आहे. आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्स फ्रॅन्चायझींनं यश धुलला 50 लाखात विकत घेतलं होतं. यश धुल कडून भविष्यात भारतीय क्रिकेटला मोठ्या अपेक्षा आहेत.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

क्रिकेटच्या देवाला खेळताना पाहण्याची पुन्हा संधी, पाहा कधी आणि कुठे होणार सामना?

कानपूर, 10 सप्टेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेलं नाव. …

Sri Lanka Vs Pakistan: ‘कॅप्टन मी आहे’, भर सामन्यात बाबरवर हे सांगायची वेळ का आली?

Pakistan In Asia Cup 2022:पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान आशिया चषक २०२२ …