Sri Lanka Vs Pakistan: ‘कॅप्टन मी आहे’, भर सामन्यात बाबरवर हे सांगायची वेळ का आली?

Pakistan In Asia Cup 2022:पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान आशिया चषक २०२२ च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. पण, याआधी सुपर-४ टप्प्यातील पाकिस्तानचा शेवटचा सामनाही श्रीलंकेविरुद्ध झाला.

श्रीलंका संघाने हा सामना जिंकला. शुक्रवारी (९ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ५ गडी पाकिस्तानला पराभूत केलं. अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका संघासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला गेला. मात्र, या सामन्यात मैदानावर एक विचित्र घटना पाहायला मिळाली.

हेही वाचा -कर्णधार बदलला आणि नशिबही… लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारताचा दणदणीत विजयाने निरोप

बाबर का संतापला

श्रीलंकेच्या डावादरम्यान पाकिस्तानचा यष्टिरक्षक (विकेटकिपर) मोहम्मद रिझवान आणि अंपायर यांनी असं काही केलं की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच संतापला. यावेळी बाबरला हे सांगावं लागलं की या संघाचा कर्णधार तो आहे. मैदानावर घडलेली ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा –शतक एक, पण विक्रम अनेक… विराट कोहलीने एकाच खेळीने केली टीकाकारांची बोलती बंद

रिझवानच्या सांगण्यावरुन अंपायरने डीआरएस दिला

ही घटना श्रीलंकेच्या डावातील १६व्या षटकात घडली. वेगवान गोलंदाज हसन अलीच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा क्रिकेटर दासून सनाकाने स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू यष्टीरक्षक रिझवानच्या हातात गेला. इकडे रिझवानला वाटले की चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि सनाका झेलबाद झालाय. त्यामुळे रिझवानने जोरदार अपील केली, पण मैदानी पंच अनिल चौधरी यांनी दासूनला नाबाद घोषित केले.

कर्णधार बाबर चांगलाच संतापला

त्यानंतर रिझवानने डीआरएस घेण्याचा इशारा केला. तर, अंपायरनेही यावर होकारार्थी उत्तर देत DRS दिला. मात्र, कर्णधार बाबर असल्यावरही अंपायरने रिझवानच्या मागणीवर डीआरएस दिल्याने बाबर भडकला. कारण, DRS देण्यापूर्वी अंपायरने बाबरला विचारलं नाही. जेव्हाकी नियमांनुसार, कर्णधारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच अंपायर DRS ला मंजूरी देतो. पण, यावेळी रिझवानच्या सांगण्यावरुन अंपायरने सरळ निर्णय दिला.

हेही वाचा -तेव्हाच कळलं होतं आता धमाका होणार! विराटसोबतच्या ‘त्या’ संवादावर एबीडीची खास २ ट्विट

कर्णधार मी आहे – बाबर आझम

यावर बाबर संतापून म्हणाला की ‘कर्णधार तर मी आहे’. बाबरची ही रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आणि सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. यानंतरही DRS घेतल्यानंतरही श्रीलंकेच्या फलंदाजाला नॉटआऊट देण्यात आला.

सैफ आणि करीना त्यांच्या मुलांसह एयरपोर्टवर कॅमेऱ्यात कैद

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

क्रिकेटच्या देवाला खेळताना पाहण्याची पुन्हा संधी, पाहा कधी आणि कुठे होणार सामना?

कानपूर, 10 सप्टेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेलं नाव. …

T20 World Cup आधी दिग्गज क्रिकेटपटूनं तडकाफडकी घेतला संन्यास

मुंबई, 10 सप्टेंबर : आशिया कप स्पर्धेदरम्यान आणि टी २० वर्ल्ड कप आधी क्रिकेट विश्वातून …