सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारच्या बोलण्यातून मिळाली ‘फिर हेरा फेरी 3’ची हिंट

मुंबई, 10 सप्टेंबर: अक्षय कुमारने शुक्रवारी त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. 9 सप्टेंबरला सुनील शेट्टीने अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अक्षय आणि सुनीलच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आतापर्यंतचे काही फोटो आहेत. हे शेअर करत सुनीलने लिहिले, ‘हे राजू, हॅपी बर्थडे रे बाबा…’. या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. याशिवाय अक्षय आणि सुनीलच्या ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटाच्या पुढच्या सीक्वलचीही हिंट चाहत्यांना मिळाली आहे.

अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अक्षयनं म्हटलं की, ‘श्याम भाई, अभिनंदनासाठी धन्यवाद. फिर थोडी हेरा फेरी करुयात?’. अक्षयचा हा रिप्लाय पाहून ही ‘फिर हेरा फेरी 3’ साठीची हिंट असल्याचं चाहते समजत आहेत. त्यामुळे चाहतेही हेरा फेरीच्या पुढच्या सीक्वलसाठी उत्सूक आहेत.

‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ असलेली पहायला मिळते. 2000 साली आलेल्या अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल स्टारर कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी’ ने एक अनोखा विक्रम बनवला होता. या चित्रपटाचा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वलही घोषित केला. 2006 मध्ये या चित्रटाचा सिक्वल आला. या चित्रपटांच्या क्रेझनं या सिक्वलवरही चाहत्यांनी अमाप प्रेम दिलं. भरभरून कौतुकांचा वर्षाव केला. गेल्या अनेक वर्षांपासून लोक ‘फिर हेरा फेरी 3’ ची (Phir hera pheri 3) वाट बघत आहे. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

हेही वाचा –  VIDEO: बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shehnaaz Gill वर नाराज झाले चाहते, काय आहे कारण?

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल स्टारर कॉमेडी चित्रपट (Comedy movie) ‘हेरा फेरी’ च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अशातच ‘फिर हेरा फेरी 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्यामुळे आता तिसऱ्या भागाला प्रेक्षक किती प्रेम देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

रस्त्यावरच रॅम्प वॉक करतेय सई ताम्हणकर; म्हणाली- स्वप्न कधीतरी खरी होतातच!

मुंबई: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar Video) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. …

मुंबईच्या रस्त्यांवर सईचा कॅटवॉग; बॉयफ्रेंडच्या आयडियानं आणली रंगत

मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत आहे. सिनेमा आणि आता …