अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती स्वप्नांविषयी बोलताना दिसते आहे. ‘ड्रीम ऑन’असं कॅप्शन देत अभिनेत्री असं म्हणते आहे की, ‘स्वप्नं फार विचित्र असतात, ती कधी आणि कशी पूर्ण होतील सांगता येत नाही. स्वप्न तुम्हाला चालायला लावतात… तुम्हाला विविध परीक्षा द्यायला लावतात. स्वप्न तुम्हाला दीर्घकाळ स्वस्थ बसू देत नाहीत. स्वप्न फार विचित्र असतात, कधीतरी खरी होतातच!’
हे वाचा-जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत हृतिकची अशी वागणूक; फॅनला सर्वांसमोर सुनावलं
या व्हिडिओमध्ये सई तिच्या एका पूर्ण झालेल्या स्वप्नाबद्दल बोलत आहे. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की आता तिचे हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता तिला शांत बसायचे नाही. ही भावना तिला नेहमी अनुभवायची आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सईने दररोज सर्वोत्तम गोष्टी करण्याविषयी या भाष्य केले आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताना ‘Dreams Are Strange’ विषयी लिहिणाऱ्याचे आभार मानलेच आहेत, याशिवाय तिने या व्हिडिओची संकल्पना सूचवणारा तिचा बॉयफ्रेंड अनिश जोगचेही आभार मानले आहेत. #ittikhushi #todreams असे हॅशटॅग वापरुन अभिनेत्रीने तिचा आनंद व्यक्त केला आहे.
हे वाचा-Video: रणबीरनंतर ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाचं ‘बीफ प्रेम’; विवेक अग्निहोत्री ट्रोल
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सईचा बॉलिवूडमध्येही डंका पाहायला मिळाला. सईने यंदाचा फिल्मफेअर (Sai Tamhankar Filmfare) पुरस्कार जिंकला असून, आयफा जिंकल्यानंतर आता हा आणखी एक पुरस्कार तिच्या नावावर झाला. यावर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर (Sai Tamhankar Win Best Actress in Supporting Role at Filmfare 2022) पुरस्कार सईने मिळवला. सईने तिच्या स्वप्नांविषयी शेअर केलेला व्हिडिओ ज्या आऊटफिटमधील आहे, तो ड्रेस तिने फिल्मफेअर पुरस्कारासाठी परिधान केला होता.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या