अक्रमकडून मधुशंकाला टिप्स
दिलशान मधुशंका हा श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आशिया चषकात मधुशंकानं श्रीलंकेच्या प्रत्येक विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. त्यानं गेल्या 5 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध 24 धावात तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. सुपर फोर फेरीतल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली. याच सामन्यानंतर मधुशंकानं वासिम अक्रमची भेट घेतली. त्यावेळी 21 वर्षांच्या या युवा गोलंदाजाला अक्रमनं काही टिप्स दिल्या. यावेळी मधुशंका अक्रमचं सांगणं लक्ष देऊन ऐकत होता. श्रीलंका क्रिकेटनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
रविवारी मेगा फायनल
टीम इंडियाचं आशिया चषकातलं आव्हान सुपर फोर फेरीतच संपुष्टात आलं. या फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ अव्वल ठरले. त्यामुळे रविवारी याच दोन संघांमध्ये आशिया चषकाची मेगा फायनल रंगणार आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेनं आतापर्यंत 5 वेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे विजेतेपदाचा सिक्सर मारण्याची संधी लंकन संघासमोर आहे. त्यात सुपर फोर फेरीतल्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानं दसुन शनाकाच्या या संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावलेला असेल.
🎥 Words of wisdom from @wasimakramlive for young Dilshan Madushanka. 😍#RoaringForGlory pic.twitter.com/3TdDq5jaBj
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 10, 2022
पाकिस्तान तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात
आशिया चषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरलाय. भारतानं आजवर 7 वेळा आशिया चषक जिंकला आहे. पण पाकिस्ताननं मात्र केवळ दोनदाच आशिया चषकावर नाव कोरलंय. पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला त्याला आता 12 वर्ष उलटली आहे. 2010 साली पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्यामुळे यंदा बाबर आझमची सेना विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज असेल.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या