दुबई, 08 सप्टेंबर: दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं क्रिकेट चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण केली. विराटकडून ज्या शतकाची आस लावून अनेक जण बसले होते ते शतक आज अखेर पूर्ण झालं. आशिया चषकातल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटनं खणखणीत शतक साजरं केलं. विराटच्या बॅटमधून निघालेलं तीन वर्षानंतरचं हे पहिलंच शतक ठरलं. तर टी20तही विराटच्या नावावर शतकाची नोंद झाली.
विराटची बहुप्रतीक्षित इनिंग
यंदाच्या आशिया चषकात विराटनं याआधी दोन अर्धशतकं झळकावली होती. पण अफगाणिस्तानविरुद्ध विराट एका वेगळ्याच अंदाजात दिसला. रोहित शर्मानं विश्रांती घेतली आणि विराट सलामीला मैदानात आला. या संधीचा फायदा उठवत विराटनं सुरुवातीपासूनच अफगाणी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. विराटनं या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 122 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे तीन वर्षानंतर झळकावलेलं पहिलंच शतक ठरलं. नोव्हेंबर 2019 साली त्यानं अखेरची शतकी खेळी केली होती. त्यानंतर विराटच्या बॅटमधून धावा निघाल्या पण शतकानं मात्र त्याला हुलकावणी दिली होती.
रिकी पॉन्टिंगशी बरोबरी
या शतकासह विराटच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 71 वर पोहोचली आहे. त्यानं आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत रिकी पॉन्टिंगशी बरोबरी साधली आहे. या यादीत विराट आता सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताचा धावांचा डोंगर
विराटच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं अफगाणिस्तानविरुद्ध 2 बाद 212 धाांवांचा डोंगर उभारला. विराटनं 122 तर लोकेश राहुलनंही 62 धावांचं योगदान दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asia cup, Sports
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या