कार्यक्रम रद्दही करू शकलो असतो पण…; आजीच्या निधनामुळे अंजिक्य झाला भावुक

मुंबई,  08 सप्टेंबर: मन उडू उडू झालं मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच सगळ्यांचा लाडका इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत. मालिकेनंतर अजिंक्यचा ‘टकाटक 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. अजिंक्य त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करताना त्याला नुकताच एका वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. सर्वत्र गणपतीचा उत्साह सुरू असताना काल अजिंक्यच्या आजीचं निधन झालं. अभिनेता आजीच्या शोकात असताना दुसरीकडे मात्र त्याला त्याच्या कमिटमेंट खुणावत होत्या काम खुणावत होती. आजी गेल्याचं दु:ख उराशी बाळगून अजिंक्यनं संध्याकाळी ठरलेल्या गणपती मंडळाला हसत हसत भेट दिली. भावुक पोस्ट शेअर करत एकाच दिवशी घडलेल्या या दोन भिन्न घटनांचा अनुभव अजिंक्यनं शेअर केला आहे.

अजिंक्यनं गणपती मंडळाला भेट दिली तिथले फोटो शेअर करत अजिंक्य म्हणाला, ‘मी काल सकाळी माझी आजी गमावली आणि संध्याकाळी एका कार्यक्रमात जायचं होतं. दिवसभर माझं मन खचून गेलं होतं. काल मला माझ्या जबाबादारीची जाणीव झाली. गणपती मंडळाची भेट मी रद्दही करू शकलो असतो आणि आजीच्या निधनावर शोक व्यक्त करू शकलो असतो. पण माझ्या आई वडिलांनी मला स्पष्टपणे हसतमुख चेहऱ्यानं कार्यक्रमाला जा असं सांगितलं.  माझ काम माझी जबाबदारी आहे आणि माझ्या आजीचीही इच्छा होती की मी अभिनेता व्हावं’.

हेही वाचा – Tu tevha tashi : अनामिकाने दिला लग्नाला नकार; आकाशच्या एन्ट्रीने मालिकेत नवा ट्विस्ट
अजिंक्य पुढे म्हणाला, ‘शेवटच्या दिवसात आजीची सेवा करावी अशी माझी इच्छा होती. पण माझ्या कामामुळे ते शक्य झालं नाही.  माझ्या कामाने मला कुटुंबापासून दूर ठेवलं आणि याच मी काहीही करू शकलो नाही’.

पोस्टमध्ये अजिंक्य शेवटी खूपच भावूक झाला. त्यानं म्हटलंय, ‘मी सगळ्यांना विनंती करतो.  तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करा जेव्हा शक्य होईल तेव्हा व्यक्त व्हा. तुमच्या जवळच्या माणसांसाठी महत्त्वाच्या वेळी उपस्थित रहा.  कारण आयुष्यातील ते नाजूक क्षण निधून गेले की ते कधीच परत आणता येत नाही. माणूस गेला की त्याला परत आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही.  बाप्पा माझ्या आजीच्या आत्म्याला शांती लाभो. नातू म्हणून मला खात्री आहे की मी तिच्यासोबत राहू शकलो नाही. तिला माझा कायम अभिमान होता ती नेहमी म्हणायची, माझा अजिंक्य कसा काम करतो, माझा नातू, माझा इठुराया’.

‘प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय मी अभिनेता म्हणून काहीच नाही. माझ्या आणि माझ्या ऑनस्क्रीन पात्रांवर तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे’, असंही अजिंक्य शेवटी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

विवेक अग्निहोत्रींचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले ‘बॉयकॉट संस्कृती चांगलीच’

मुंबई, 17 सप्टेंबर :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून  बॉलिवूडवर जोरदार टीका होत आहे. कोणताही …

बच्चन कुटुंबाच्या 3 पिढ्या येणार एकत्र; बिग बींची नात करणार कुटुंबाची पोलखोल

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांच्याविषयी …