बॉलिवूडच्या बॉयकॉट संस्कृतीवर एका न्यूज पोर्टलशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ”हा खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ‘बॉलिवुडवर बहिष्कार टाका’ मोहीम खरंतर चांगली आहे कारण बॉलीवूड मध्ये तयार केल्या जाणाऱ्या चित्रपटांविषयी लोकांमध्ये सध्या प्रचंड निराशा आहे.” पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ”पण या ट्रेंडचा अंतिम परिणाम खूप सकारात्मक असेल. कारण बॉलीवूडला सुधारण्यासाठी ही चांगली संधी आहे. ”
हेही वाचा – Alia Bhatt : प्रेग्नेंसीनंतर ‘या’ चित्रपटातून आलिया करणार पुनरागमन; मेगा बजेट चित्रपटात साऊथ सुपरस्टारसोबत रोमान्स!
याच मुलाखतीत पुढे विवेकना विचारण्यात आले की, ”ही बॉयकॉट मोहीम उजव्या पक्षाकडून केली जात आहे का? या प्रश्नाचे अगदी थेट उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ”हे बॉलीवूडविरुद्धचे सांस्कृतिक बंड आहे.” मात्र, यादरम्यान विवेकने आपण बॉलिवूडचा भाग नसल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “मी बॉलीवूडचा भाग नाही. मी समोर कोणतेही उद्दिष्ट ठेऊन चित्रपट बनवत नाही उलट मी यातून बाहेर पडून हिंदी चित्रपट बनवतो.”
विवेक अग्निहोत्री पुढे बॉलिवूडच्या दिगदर्शकांना आणि निर्मात्यांना एक सल्ला देत त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ”मला फक्त फिल्म इंडस्ट्री सुधारण्याची इच्छा आहे. बॉलीवूडचे बनावट बिझनेस मॉडेल हे एखाद्या हवेच्या फुग्यासारखे फुटले आहे. इंडस्ट्रीने कथा, लेखक, दिग्दर्शक अशा मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी स्टार्स आणि पीआर मोहिमेपेक्षा यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या