‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘बच्चन पांडे’, नवीन वर्षात ‘या’ सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

Bollywood Movies : नवीन वर्षात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक सिनेमांचा सहभाग आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 

बधाई दो : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ 28.33 कोटींची कमाई केली. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.  

गंगूबाई काठियावाडी : ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. 25 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. 

झुंड : नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चनचा ‘झुंड’ सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. 

राधे श्याम : ‘राधे श्याम’ सिनेमात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे बजेट 300-350 कोटी होती. आतापर्यंत या सिनेमाने 212.76 कोटींची कमाई केली आहे. 

हेही वाचा :  धक्कादायक! पार्लरमध्ये काम देतो सांगून अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

द कश्मीर फाइल्स : काश्मिरी पंडितांवर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा केवळ 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. विवेक अग्निहोत्रीच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करेल. 

बच्चन पांडे : अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने आतापर्यंत केवळ 38.25 कोटींची कमाई केली आहे. 

आरआरआर : एस.एस राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 18 कोटींची कमाई केली आहे. 

संबंधित बातम्या

RRR Box Office Collection Day 1: जगभरातील बॉक्स ऑफिसवर RRR ची जादू; पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

ABP Ideas of India: माझं नाव खान असल्याने मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो – कबीर खान

#RipJosephVijay : अभिनेता जिवंत असतानाही सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #RipJosephVijay! जाणून घ्या नेमकं काय झालं…

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …