भारतीय संघाचे कर्णधारपद या सामन्यासाठी लोकेश राहुलला देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघात अजून तीन बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात दिनेश कार्तिक, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघातून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
अवेश खानही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण अवेशच्या जागी अजूनही बदली खेळाडूची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे अवेशची जागा कोण घेणार, यावर चर्चा करण्यात आली. अवेश खानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. अवेशने गेल्या सामन्यात पाकिस्तानच्या फखर झमानला बाद करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले होते. पण आता तो या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी तापामुळे अवेश आपल्या रुमबाहेरच आला नाही, त्यामुळे त्याला सरावही करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आता अवेश संघाबाहेर होता. त्यानंतर अवेश हा आता या स्पर्धेत खेळू शक नाही, अशी अपडेट भारतीय संघाने दिली होती. आता अवेशच्या जागी भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरला प्रवेश दिला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात झोकात पुनरागमन करणारा आणि भारतासाठी मॅचविनर ठरलेला दीपक चहर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दीपक हा भारताकडून गोलंदाजी करताना दिसू शकतो.
संघात सातत्याने होत असलेल्या बदलांवरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या बदलांमुळे संघासाठी विशेष काही घडले नाही, परंतु संघाच्या कामगिरीत घसरण मात्र नक्कीच झाली. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे संघातील सीनियर खेळाडूंना प्रत्येक मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत नव्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली, पण वरिष्ठ खेळाडू ब्रेकमधून परत येताच त्यांना वगळावे लागले. याशिवाय दुखापतींनी उरलेली कसर भरून काढली. गेल्या सहा महिन्यांत संघात अस्थिरता दिसून येत आहे. संघात सतत नवीन चेहऱ्यांना संधी मिळत असली तरी त्यांच्यासमोर अनिश्चितता कायम आहे. अशा स्थितीत खेळाडूंच्या लयीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या