जुन्या विराटची झलक…
कालच्या सामन्यानंतर क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, काल रात्री जुन्या विराट कोहलीची झलक पाहायला मिळाली. मला वाटतं की त्याला त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल. विराटने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून एक हजारपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. त्याचा फॉर्मही काही काळापासून इतका चांगला नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो.’
इरफान पठाणकडूनही कौतुक
दरम्यान विराटच्या खेळीवर इरफान पठाणनही कमेंट केली आहे. ‘विराट हा या खेळाचा लीजंड आहे. जेव्हा तो मैदानात येतो तेव्हा त्याला प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. याआधी गे सचिन तेंडुलकरबाबतीत दिसलं. तो खरोखरच एक दिग्गज खेळाडू आहे.’
हेही वाचा – Asia Cup 2022: ज्या मैदानावरुन स्ट्रेचरवरुन नेलं, तिथेच केला मोठा पराक्रम; पाहा हार्दिकची भावनिक पोस्ट
विराटचा शंभरावा टी20 सामना
दुबईतला पाकविरुद्धचा सामना त्याच्या ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतला शंभरावा सामना ठरला. वन डे, टी20 आणि कसोटीत शंभर सामने खेळणारा विराट हा भारताचा पहिलाच तर जगातला दुसरा क्रिकेटर ठरला. याआधी न्यूझीलंडच्या रॉस टेलरनं तिन्ही फॉरमॅटमध्ये शंभरपेक्षा जास्त सामने खेळले होते.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या