ज्या मैदानातून स्ट्रेचरवरुन नेलं, तिथेच केला मोठा पराक्रम; पंड्याची भावनिक पोस्ट

दुबई, 29 ऑगस्ट: भारत आणि पाकिस्तान संघातल्या रविवारी झालेल्या महामुकाबल्याचा हीरो ठरला तो अष्टपैलू हार्दिक पंड्या. तीन विकेट्स आणि नाबाद 33 धावा अशी कामगिरी करत हार्दिक पंड्यानं भारताला दिमाखात जिंकून दिलं. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध ही हार्दिकची आणखी एक मोठी कामगिरी ठरली. पण 2018 सालच्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच हार्दिकला एका मोठ्या दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. ही दुखापत त्याच्या कारकीर्दीतला एक मोठा अडथळा बनली होती.

काय घडलं होतं त्या सामन्यात?

19 सप्टेंबर 2018 साली झालेल्या दुबईतल्या त्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करताना मैदानातच कोसळला. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला उठणंही मुश्किल झालं होतं. स्ट्रेचरवरुन त्याला मैदानाबाहेर न्यावं लागलं. हार्दिकचं करीअर संपणार की काय अशी परिस्थिती होती. पण बऱ्याच महिन्यांनी हार्दिक त्या दुखापतीतून सावरला. आणि त्यानं मैदानात कमबॅक केलं.

हार्दिककडून ट्विटरवर पोस्ट

ट्विटरवर आज एक पोस्ट केली. त्यात त्यानं 2018 सालचा स्ट्रेचरवरुन नेतानाचा फोटो आणि कालच्या सामन्यानंतरचा फोटो एकत्र पोस्ट केला आहे. दरम्यान या कमबॅकसाठी हार्दिकनं टीम इंडियाचे माजी फिजिओ नितीन पटेल आणि सध्याचे स्ट्रेन्थ अँड कन्डिशनिंग कोच सोहम देसाई यांचे आभार मानले आहेत. याचं श्रेय हार्दिकनं या दोघांना दिलं आहे.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous …म्हणून टायगर श्रॉफ रणवीर सिंहवर जळतो;Koffee With Karanमध्ये सांगितलं खरं कारण
Next मराठीतील ‘हा’ सिनियर अभिनेता आहे संकर्षण कऱ्हाडेचा खास दोस्त

Check Also

मोहालीतच रोहितनं सांगितली पुढच्या मॅचची टीम, ‘या’ खेळाडूचं कमबॅक पक्कं

मोहाली, 20 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रेकेविरुद्ध …

क्रिकेटमध्ये आता ‘मंकडिंग’ नाही तर रन आऊट, 1 ऑक्टोबरपासून ICC लागू करणार हे नियम

मुंबई, 20 सप्टेंबर: येत्या एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या अनेक नियमात मोठे बदल केले जाणार आहेत. जागतिक …