Rupa Dutta : बंगाली सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रुपा दत्ताला (Rupa Dutta) पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिच्यावर पाकीटमारीचा आरोप लावण्यात आला आहे. 12 मार्च रोजी कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात ही घटना घडली आहे.
प्रदर्शनाच्या ठिकाणी एक महिला कचरापेटीत पर्स फेकून देत असल्याचे दिसले. पर्स कचरापेटीत फेकत असल्याचे बघून तिथे उपस्थित पोलिसाने संबंधित महिलेकडे चौकशी केली. पर्स कचऱ्यात का फेकत आहात या प्रश्नाला संबंधित महिलेने समाधानकारक उत्तर दिले नाही. अखेर पोलीस अधिकाऱ्याने महिलेजवळची मोठी पर्स तपासली. या पर्सला अनेक कप्पे तयार केलेले दिसले. मोठ्या पर्समध्ये 75 हजार रुपयांची रोख रक्कम आढळली. या पैशांविषयी महिला समाधानकारक माहिती देऊ शकली नाही, अखेर पोलिसांनी पाकीटमारीच्या आरोपात महिलेला अटक केली. अटक केल्यानंतर संबंधित महिला कोण याची चौकशी सुरू झाली आणि धक्कादायक माहिती हाती आली. अखेर ही महिला अभिनेत्री रुपा दत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री रुपा दत्ताने पाकीटमारीचा आरोप मान्य केला आहे. रूपा दत्ता गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या पर्स चोरायची. पण अखेर पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांना अभिनेत्रीची एक डायरीदेखील सापडली आहे. यात अभिनेत्रीने चोरी केलेल्या सर्व रकमेचा हिशोब लिहिलेला आहे.
अनुराग कश्यप के नज़रों में किसी भी औरत का कोई इज्ज़त नहीं है।जो मुझे उसे जानने के बाद पता चला।इसीलिए पायेल घोष का इल्ज़ाम बिलकुल सही है।अनुराग कश्यप को कठोर से कठोर सज़ा मिलनी चाहिए।और यह ड्रग भी लेता है।अपने आर्टिस्ट को भी सप्लाई करता है
NCB जांच करे कृपा।#arrestanuragkashyab pic.twitter.com/ckK5ZfUDOW
— Rupa Dutta (@iamrupadutta) September 19, 2020
रुपा दत्ता बंगाली सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. रूपाने 2020 साली अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut On The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमावर ‘पंगा क्वीन’ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त
Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ आता ओटीटीवर पाहता येणार; पाहा कोणत्या अॅपवर, कधी रिलीज होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या