मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती, रिटायर्ट व्यक्तींनाही मिळू शकेल ७५ हजारपर्यंत पगार

Central Railway Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेमध्ये मुंबई (Central Railway Recruitment 2022) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन ( Central Railway Recruitment Cell Notification) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मुंबईने (Central Railway Recruitment 2022) जाहीरकेलेल्या नोटिफिकेशननुसार वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर
पदांची (Contract Medical Practitioner Doctor) भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.

कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर पदांच्या १२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एमबीबीएसची पदवी (MBBS Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. मध्य रेल्वे भरती बोर्डाकडून (Railway Recruitment Board) जाहीर करण्यात आलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. रिटायर्ड उमेदवारांना देखील या रिक्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत बंपर भरती
ACTREC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती, ४३ हजारपर्यंत मिळेल पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

Forest Department Job: पदवीधरांना वन विभागात काम करण्याची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज
Job 2022: ‘या’ महानगरपालिकेत विविध पदांची भरती, बारावी ते पदवीधर उमेदवारांना संधी
उमेदवारांनी आपले अर्ज [email protected] या पत्त्यावर पाठवायचे आहेत. १७ जून २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Tilak University मध्ये भरती, दहावी ते पदवीधर उमेदवारांनी नोकरीसाठी राहा तयार
Railway Recruitment:दहावी उत्तीर्णांना रेल्वेत काम करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous डोकेदुखी, बैचेनी, अपचन, डायबिटीज, थायरॉइडवर रामबाण आहे आयुर्वेदिक डॉक्टरांची ‘ही’ मॅजिकल टी, उन्हाळा जाईल हेल्दी..!
Next मुंबई-कोलकाता यांच्यात आज मोठी लढत, रायडर्ससमोर इंडियन्सचं मोठं आव्हान; कधी, कुठे पाहणार सामना?

Check Also

Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE

म. टा. प्रतिनिधी, पुणेविज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा …

RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण …