शिर्के पाटलांच्या घरात साजरं होणार गौरीचं डोहाळेजेवण; पण येणार मोठं विघ्न

मुंबई, 09 सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी आणि जयदीप यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते. गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी धडवून आणत असते. पण ही  दोघे सगळ्या संकटांचा सामना करतात. पण आता दोघांमध्ये तिसरा पाहुणा  येणार आहे. सध्या गौरी गरोदर आहे. त्यामुळॆ घरात आनंदाचं वातावरण आहे. आता लकरच शिर्के पाटलांच्या घरी गौरीचं डोहाळेजेवण साजरं होणार आहे.पण याचवेळी मालिकेत एक मोठं ट्विस्ट येणार आहे.

मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार मालिकेच्या आगामी भागांमध्ये  शिर्के पाटलांच्या घरी गौरीचं डोहाळेजेवण साजरं होणार आहे.सगळे अगदी उत्साहात आणि आनंदात आहेत. पण शालिनी या आनंदात विघ्न आणणार आहे. गौरीच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात गौरी ज्या झोपाळ्यावर बसलेली असते तोच निसटतो आणि गौरी त्यावरून खाली पडते. हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.

या प्रसंगामुळे मालिकेला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. गौरी आणि तिच्या बाळाच्या जीवाला यामुळे काही धोका तर निर्माण होणार नाही ना, ती या घटनेतून वाचणार का या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळतील.
हेही वाचा – Dar ughad baye : मालिकेसाठी सानियाने घेतले खास संबळ वादनाचे प्रशिक्षण; पाहा व्हिडीओ
मालिकेत हे सगळं शालिनीने घडवून आणलं आहे. तिने झोपल्याचे स्क्रू आधीच काढून ठेवलेले असतात. पण आता हे गौरीच्या जीवावर बेतणार असं दिसतंय. त्यामुळे मालिकेचे येणारे भाग पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेत नुकतीच बिग बॉस फेम विकास पाटील याची एंट्री झाली आहे. त्याने गौरी आणि जयदीपच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा यांच्या नात्यावर काही परिणाम झाला नाही.
सुख म्हणजे काय असतं  मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे मालिका टीआरपी मध्ये पाच मध्ये आहे.  या मालिकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.  आता येणाऱ्या काळात मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘बायकॉट’चा धसका, क्रिती सेनन आणि शाहिद कपूरला मोठा फटका बसण्याची शक्यता

मुंबई: हिंदी चित्रपटांत आगामी काळात अनेक नव्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यापैकी एक जोडी …

विवेक अग्निहोत्रींसोबत रंगायच्या सुशांतच्या गप्पा! दिग्दर्शकाने शेअर केला अभिनेत्याचा हसरा सेल्फी

मुंबई: ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) हे नाव नेहमीच …