‘बायकॉट’चा धसका, क्रिती सेनन आणि शाहिद कपूरला मोठा फटका बसण्याची शक्यता

मुंबई: हिंदी चित्रपटांत आगामी काळात अनेक नव्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यापैकी एक जोडी म्हणजे क्रिती सेनन आणि शाहिद कपूर. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. पण आता या सिनेमाचं चित्रीकरण लांबणीवर गेल्याचं कळतं.
सोनाली फोगाट यांची हत्याच, पण सगळ्यांच्या डोक्यातला तो प्रश्न अद्याप अनुत्तरीतच

सध्या बॉलिवूड सिनेमांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहता, अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमाचं नियोजन पुढं ढकललं आहे. त्यात क्रिती-शाहीदच्या सिनेमाचाही समावेश आहे. या चित्रपटाचं बजेट आवाक्याच्या बाहेर जात असल्यानं सिनेमा तूर्तास बाजूला ठेवल्याचं समजतं.

तसंच शाहीदनं मानधनात वाढ केल्यानं त्यांच्या सिनेमाचं बजेट कोसळल्याचंही बोललं जातंय. त्यातच त्यानं संहितेत काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार क्लायमॅक्स करण्यासाठीही काही वेळ जाणार असल्यानं या सिनेमाचं काम २०२३च्या सुरुवातीला सुरू होणार असल्याची चिन्हं आहेत.
बिग बॉसमध्ये जाणार? हार्दिक जोशीच्या उत्तरानं प्रेक्षक पडले बुचकळ्यात
चित्रपटात व्हीएफएक्सचाही जास्त वापर करण्यात येणार असल्यानं बजेट आधीच वाढलं होतं. आता या सगळ्यावर निर्माते कसा मार्ग शोधतात, की सिनेमाच डब्ब्यात जातो हे लवकरच समजेल.

या जोड्यांचीही चर्चा
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण ही आणखी एक नवी जोडी पडद्यावर येईल. ‘फायटर’ या चित्रपटात ही दोघं झळकणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट भारतातला पहिला ‘एरियल अॅक्शन फ्रँचाइझ’असेल अशी चर्चा आहे.

‘शेरशाह’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा-रश्मिका मंदन्ना यांचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट चर्चेत आहे. ही स्पाय थ्रिलर प्रेमकहाणी दिग्दर्शक शंतनू बागची आणत आहे. रश्मिका या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करत आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

कितीही सिनेमे होऊ देत फ्लाॅप,अक्षय कुमारचं कधीच होणार नाही नुकसान, एकूण संपत्तीबद्दल इथे वाचा

मुंबई : बाॅलिवूड खिलाडी अक्षय कुमारचे सिनेमे सध्या चालत नाहीत. बच्चन पांडे, रक्षाबंधन, अतरंगी रे, …

विवेक अग्निहोत्रींसोबत रंगायच्या सुशांतच्या गप्पा! दिग्दर्शकाने शेअर केला अभिनेत्याचा हसरा सेल्फी

मुंबई: ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) हे नाव नेहमीच …