हे वाचा-धर्मवीर फेम प्रसाद ओक सहकुटुंब ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शेअर केला खास फोटो
विवेक अग्निहोत्रींनी हा फोटो शेअर करताना म्हटले की, ‘सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत. मी आता त्याच जागी आहे जिथे आम्ही आयुष्य, ब्रह्मांड, गॉड पार्टिकल, शेखर कपूर यांचा ‘पानी’ आणि मध्यमवर्गीय-छोट्या शहरातील बॉलिवूडमधील व्यक्तीच्या आयुष्यातील कष्ट याविषयी बोलताना अनेक संध्याकाळ घालवल्या आहेत.’ विवेक यांनी शेअर केलेल्या फोटोतील सुशांतच्या हसऱ्या चेहऱ्यावरच नजर खिळून राहते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी कमेंट करत सुशांतची आठवण येत असल्याच्या कमेंट केल्या आहेत.
विवेक यांनी या ट्वीटमध्ये ज्या ‘पानी’ सिनेमाचा उल्लेख केला आहे, तो सुशांतचा अपूर्ण राहिलेला एक सिनेमा आहे. यशराज फिल्म्समधून बाहेर पडल्यानंतर अनेक महिन्यासाठी सुशांत या सिनेमावर काम करत होता, पण तो सिनेमा बंद पडला. मनोज वाजपेयी यांच्याशी झालेल्या जुन्या संभाषणात शेखर यांनी सांगितले होते की, जेव्हा हे घडले तेव्हा ते आणि सुशांत दोघेही रडले होते. ते असं म्हणाले होते की, ‘जेव्हा चित्रपट बंद करण्यात आला आणि तो चित्रपट करणार नसल्याचे जेव्हा त्याला समजले तेव्हा तो खूप रडला. मी पण रडलो.’
हे वाचा-रणबीर ठरणार ‘ब्रह्मास्त्र’ आपटण्याचं कारण? ४ कारणांमुळे ट्रोल आर्मीच्या निशाण्यावर
२०२० साली अभिनेता सुशांतचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितले होते. मात्र दीर्घकाळ सुरू असणाऱ्या या प्रकरणातील तपासानंतर याप्रकरणी ड्रग केसही समोर आली होती. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ यांच्यासह इतर काही जणांना याप्रकरणी अटक झाली होती. शिवाय बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींची अंमली पदार्थ सेवन आणि तस्करीसंदर्भात चौकशीही झालेली.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या