वर्षा बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या वर्षा या निवासस्थानी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली. वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. बॉलिवूडमधील बड्या कलाकारांसह मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं देखील वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिनं एक काही फोटो शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं मुख्यमंत्री तसंच कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

प्राजक्तानं शेअर केलेल्या या फोटोत तिची सहकलाकार नम्रता संभेराव देखील दिसून येतेय. इतकंच नव्हे तर बॉलिवूडचे जॅकी दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांच्यासोबतही तिला काही वेळ घालवता आला. हा सर्व अनुभव तिनं तिच्या पोस्टमध्ये शेअर केलाय.


काय आहे प्राजक्ताची पोस्ट?
‘वर्षा’बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं. अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे. परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला. आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मा. श्रीकांत शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार…जॅकी दादांबरोबरचे क्षण म्हणजे चेरी ऑन द केक.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“वर्षा” बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं’; प्राजक्ता माळीची पोस्ट

मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री प्राजक्ता माळी एक गुणी अभिनेत्री आहे. ती कायम चर्चेत असते. …

ऐन गणपतीत कुशल बद्रिकेच्या तोंडचा घासच कोणी काढून घेतला? हा Video पाहिलात तर कळेल!

मुंबई : अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. अनेक गमतीशीर पोस्ट तो शेअर …