प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमातील एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये धर्मवारींच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकनं एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो धर्मवीरच्या ट्रेलर लाँच वेळीचा असून या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. तर दुसरा फोटो हा धर्मवीर सिनेमातील आहे. एकनाथ शिंदे देवाच्या पाया पडत असताना आनंद दिघे त्यांना पाहत आहेत. हे दोन्ही फोटो आताच्या घडीला फार मोठा अर्थ सांगून जात आहेत.
हेही वाचा – VIDEO:आम्ही पुन्हा आलो! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या कलाकारांचा जल्लोष नक्की कुणासाठी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत प्रसाद ओक यानं म्हटलंय, ‘मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!’, प्रसादच्या या शुभेच्छांमध्ये त्याचा एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्याबद्दल असलेला अभिमान आणि भावना दिसून आल्या आहेत.
धर्मवीर सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील प्रसाद ओकनं शेअर केलेल्या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. प्रसाद ओकनं धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी दिघेंच्या वेशातील प्रसाद ओक स्टेज आला तेव्हा एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे समोर उभे असल्याचा भास झाला आणि त्यांनी प्रसाद ओकच्या भूमिकेत असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंचे पाय धरले. हा प्रसंग कायम सर्वांच्या लक्षात राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या