लाल सिंग चड्ढा पाहायला पोहोचली रिंकू राजगुरू ; ट्रोलर्स म्हणाले ‘तुझेही सिनेमे आता Boycott’

मुंबई: आमिर खानचा बहुचर्चित सिनेमा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी सिनेमा देशात बॅन केला जावा अशी मागणी केली जात होती. सोशल मीडियावर तर #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत होतं. अजूनही काही प्रमाणात हा ट्रेंड सुरू असला तर अनेक चाहते या सिनेमाचे कौतुक करत आहेत.

आमिर खानच्या चाहत्यांनी या सिनेमाबाबत सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत. आमिरची अशीच एक चाहती म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू. तिने देखील एक स्पेशल पोस्ट ‘लाल सिंग चड्ढा’साठी (Rinku Rajguru Post for Laal Singh Chaddha) केली आहे. पण ही पोस्ट करणं तिला अडचणीचं ठरू शकतं.

हे वाचा-टकाटक २ मधील ‘इंद्रा’चा लिपलॉक सीन व्हायरल; चाहते म्हणाले- खूपच हॉरिबल किस

रिंकूला ही पोस्ट करणं अडचणीचं ठरू शकतं कारण तिच्या अनेक चाहत्यांनी तिला या सिनेमाचं प्रमोशन न करण्याचा सल्ला दिला आहे. या सिनेमाचं प्रमोशन तिला महागात पडू शकतं असंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अभिनेत्रीने आमिर खान नागा चैतन्य या दोघांसह फोटो शेअर केला आहे. रिंकू म्हणतेय की, ‘लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगदरम्यान… नक्की बघावा असा सिनेमा. आमिर खान प्रोडक्शन आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा’.


रिंकूची ही पोस्ट पाहून तिचे चाहते भडकले आहेत. काहींनी कमेंट केली आहे की आता यानंतर तुझेही चित्रपट Boycott केले जातील. ‘तुला अनफॉलो करतोय’, ‘असं नको करू, नाहीतर तु देखील बॉयकॉट’, ‘सॉरी रिंकू हा सिनेमा प्रमोट करू नको. तु कुठे होतीस जेव्हा आमिर हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवत होता?’, अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर केल्या जात आहेत. आणखी एक युजर म्हणतो आहे की, ‘लोकं तुझे पिक्चर बघणं सोडून देतील रिंकू… विचार करून प्रमोशन कर आमिरच्या पिक्चरचं’. याशिवाय इतर मराठी सिनेमांचं प्रमोशन का करत नाही असा सवालही काही चाहत्यांनी रिंकूला विचारला आहे.

हे वाचा-रिंकू राजगुरूनं भावाबरोबर साजरं केलं रक्षाबंधन, दोघांचे Photo पाहून चाहते खूश

दरम्यान रिंकूच्या या पोस्टवर अनेक अशा कमेंट्स आहेत ज्यामध्ये केवळ #BoycottLaalSinghChaddha लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आता नेटिझन्सनी कमेंट्स केल्याप्रमाणे रिंकूच्या या पोस्टचा तिच्या आगामी सिनेमांवर परिणाम होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अभिनेत्रीच्या लेटेस्ट प्रोजेक्टबाबत बोलायचं झालं तर ती अलीकडेच आठवा रंग प्रेमाचा या सिनेमात अॅसिड अटॅक पीडितेच्या भूमिकेत दिसली होती.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous शूटिंग करताना अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना, चाहतेही चिंतेत
Next कोण आहे हरिका द्रोणावल्ली? ९ महिन्याच्या गर्भवती असताना देशाला जिंकून दिले पदक

Check Also

‘सुशांतची आत्महत्या नाही हत्याच’, आमिर खानच्या भावाचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई, 16 सप्टेंबर : सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन 2 वर्ष झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर …

ठरलं! ‘या’ दिवशी येणार आयुष्मान खुरानाची ‘ड्रीम गर्ल 2’; इथं पाहा तारीख

मुंबई, 16 सप्टेंबर : 2019 मध्ये आलेला  ड्रीम गर्ल हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटात आयुष्मान …